Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - “ENCOUNTER WITH THE MOMENT” An Exhibition of Photographs by Gurdeep Dhiman at Jehangir Art Gallery in Mumbai - VENTIVE HOSPITALITY LIMITED ANNOUNCED ITS Rs. 16,000 MILLION INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON FRIDAY, DECEMBER 20, 2024 Sets Price Band fixed at Rs. 610 to Rs. 643 per equity share of face value of Rs. 1 each - Dr Agarwals Eye Hospital, Chembur, launches advanced laser system for precise and bladeless corneal surgery, Renowned actress Saiee Manjrekar inaugurates the state-of-the-art WaveLight FS200 Femtosecond Laser System - DAM Capital Advisors Limited announced its initial public offering (IPO) to open on Thursday, December 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 269/- per equity share to ₹ 283/- per equity share of the face value of ₹2 each - TRANSRAIL LIGHTING LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY, DECEMBER 19, 2024 Sets Price Band has been fixed at ₹ 410.00 to ₹ 432.00 per equity share, of face value ₹2 each - CONCORD ENVIRO SYSTEMS LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY DECEMBER 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 665 to ₹ 701 per equity share of face value of ₹5 each - “NATURALNESS” An Exhibition of Recent works will be displayed by artist Ramdas Manikrao Thorat in Jehangir Art Gallery in Mumbai - GNG ELECTRONICS LIMITED FILES DRHP WITH SEBI - Conscious Collective unveils its second editionThe initiative will showcase the transformative power of collaboration and creativity; sparking discussions on sustainable living, practices and design solutions - MAMATA MACHINERY LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING TO OPEN ON THURSDAY, DECEMBER 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 230 to ₹ 243 per equity share of face value of ₹10 each

अपोलोच्या हृदय प्रत्यारोपण पथकाने केली किमया एकापेक्षा जास्त अवयव निकामी झालेल्या ४० वर्षीय रुग्णाला दिले जीवनदान

नवी मुंबई, ९ नोव्हेंबर २०२२ (GNI): जेसीआय मान्यताप्राप्त नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे एक परिपूर्ण व प्रगत वैद्यकीय सेवा पुरवणारे रुग्णालय आहे. आता या प्रतिष्ठित रुग्णालयाने हृदय निकामी झालेल्या नाशिकमधील ४० वर्षीय रुग्ण श्री. नवनाथ जर्हाड यांच्यावर गुंतागुंतीची अशी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. याआधी रुग्णाचे हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाले होते. यामुळे वजन खूप कमी होणे, ओटीपोटीत पाणी साचणे (असाइटीस) आणि दोन्ही फुफ्फुसांच्या आत दोन्ही बाजूला पाणी साचणे अशा तक्रारी निर्माण झाल्या होत्या. रुग्णाला मुंबईच्या पश्चिम विभागातून दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयातून अवयव प्राप्त झाला होता, हा अवयव केडीएच अंधेरी पश्चिम येथून ग्रीन कॉरिडॉरद्वारे नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे नेण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरॅसिक टीमने पाच तासांची जटिल प्रक्रिया करुन रुग्णाची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली.

४० वर्षांच्या या रुग्णाला इस्केमिक कार्डिओमायोपॅथीमुळे हृदयविकाराचा त्रास झाला होता. जानेवारी २०२२ मध्ये त्याची ट्रिपल-वेसल अँजिओप्लास्टी देखील झाली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या रोगाचे लक्षण खूप दिसू लागले होते आणि त्यांना उपचारांची नितांत आवश्यकता होती. हृदय, फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. त्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की ते १०० मीटरपेक्षा जास्त चालू शकत नव्हते आणि त्यांना रात्री व्यवस्थित झोप लागत नव्हती.

डॉ. संजीव जाधव, संचालक, मुख्य हृदय शल्यचिकित्सक-हृदय फुफ्फुस प्रत्यारोपण, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, “या रुग्णाचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यांना श्वासोच्छवासाचा खूप त्रास होता आणि त्यांच्या दोन्ही पायांवर व चेहऱ्यावर सूज आली होती, उदरामध्ये खूप पाणी साचलं होतं (असाइटीस) आणि त्यांच्या दोन्ही फुफ्फुसाभोवती दोन्ही बाजूला पाणी साचलं होतं. त्यांना इतर आजार होण्याचा आणि मृत्यू येण्याचा धोका देखील खूप जास्त होता. महत्वाचे म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांच्या जीवनशैलीवर आणि कुटुंबावर देखील विपरित परिणाम होत होता, म्हणून त्यांना उपचार घेणे आवश्यक होते. त्यांना २२ वर्षांच्या मृत दात्याकडून हृदय मिळाले होते आणि प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. प्रत्यारोपणानंतर त्यांचे इतर महत्वाचे अवयव व्यवस्थित काम करु लागले आणि त्यांची प्रकृती देखील सुधारली.”

संतोष मराठे, सीईओ – प्रादेशिक पश्चिमी क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले, “अपोलोने हृदय प्रत्यारोपणाची ही ७ वी यशस्वी शस्त्रक्रिया केली. हृदय प्रत्यारोपण ही एक अद्भूत प्रक्रिया आहे. एकापेक्षा जास्त अवयव निकामी झाले असतील तर जगण्याची शक्यता कमी असते. आमच्या टीमसमोर खूप मोठी आव्हाने होती. तरीसुद्धा त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आमच्या रुग्णालयात देशातील आणि आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी यकृत, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपणाची अनेक जटिल प्रकरणे हाताळली जातात अपोलोकडे कुशल व बहु-गुणवत्ता असलेली टीम आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "अपोलोच्या हृदय प्रत्यारोपण पथकाने केली किमया एकापेक्षा जास्त अवयव निकामी झालेल्या ४० वर्षीय रुग्णाला दिले जीवनदान"

Leave a comment

Your email address will not be published.


*