इंडियन इन्स्टिट्यूट मिलेट रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये टाटा कन्ज्युमर सोलफुलने लॉन्च केली ‘मिलेट म्यूसली’ टाटा सोलफुलला ‘पोषक अनाज पुरस्कार २०२२’ बहाल केला

मुंबई, ३ ऑक्टोबर  २०२२ (GNI): टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्स या टाटा सोलफुल ब्रँडच्या मालक कंपनीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या आपल्या पोर्टफोलिओच्या बरोबरीनेच मिलेट म्युसली हे उत्पादन देखील नुकत्याच पार पडलेल्या आयसीएआर-आयआयएमआर नॅशनल न्यूट्री-सिरीयल कन्व्हेन्शन ४.० मध्ये लॉन्च केले आहे. सुधारित मिलेट म्युसलीमध्ये नाचणी, बाजरी आणि ज्वारी यासारखी तृणधान्ये २५% प्रमाणात असल्याने आरोग्याला पोषक अशा उत्पादनांमधून अधिक चांगला स्वाद व जास्त कुरकुरीतपणा ग्राहकांना मिळवून देण्याच्या दृष्टीने ब्रॅंडने पुढचे पाऊल उचलले आहे. 

या अधिवेशनात टाटा कन्ज्युमर सोलफुलला पोषक अनाज पुरस्कार २०२२ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. तृणधान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या ब्रँडमार्फत केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे, नावीन्यपूर्णतेचे आणि ग्राहकांना तृणधान्यांपासून बनलेली स्वादिष्ट, पोषक, सुविधाजनक व आधुनिक स्वरूपाची उत्पादने देण्याच्या परंपरेचे हे फलित आहे.

श्री. प्रशांत परमेश्वरन, एमडी-सीईओ, टाटा कन्ज्युमर सोलफुल यांनी सांगितले, “ग्राहकांसाठी उच्च दर्जाची, आरोग्यदायी तृणधान्यांनी बनलेली उत्पादने स्वादिष्ट स्वरूपात देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे धोरण आम्ही कायम राखले आहे आणि अशावेळी आयसीएआर-आयआयएमआरकडून पोषक अनाज पुरस्कारांचा एक भाग म्हणून सन्मानित केले गेल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  तृणधान्यांवर आधारित स्वादिष्ट उत्पादनांच्या क्षेत्रात आम्ही सतत नवनवीन गोष्टी सादर करत आहोत आणि संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे, त्याला अनुसरून आम्ही तृणधान्यांवर आधारित उत्पादने तयार करत आहोत.”  

गेल्या वर्षी टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्सने पारंपरिक धान्यांना अधिक आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत व पर्यावरणानुकूल पर्याय म्हणून तृणधान्यांच्या संपूर्ण क्षमतांचा वापर करण्यासाठी आयआयएमआरसोबत करार केला. या दोन्ही संस्थांची संशोधन व विकास नैपुण्ये एकत्र आणली जावीत, तृणधान्यांच्या विभागात आपला उत्पादन पोर्टफोलिओ टीसीपीला अधिक जास्त मजबूत करता यावा, ग्राहकांसाठी अधिक मूल्यवर्धित स्वरूपाची उत्पादने विकसित करता यावीत आणि देशभरातील अनेक ग्राहकांसाठी तृणधान्ये उपलब्ध व्हावीत हे या भागीदारीचे उद्दिष्ट होते. यावर्षी ब्रँडने अधिवेशनामध्ये टाटा सोलफुल मसाला ओट्स+ स्टॉल देखील उभारला आहे, अधिवेशनात येणाऱ्या व्यक्तींना याठिकाणी टाटा सोलफुलच्या सर्वात नव्या उत्पादनाचा स्वादिष्ट अनुभव घेता आला.

डॉ. दयाकर राव, न्यूट्रिहब-सीईओ, आयसीएआर-आयआयएमआर यांनी सांगितले, “तृणधान्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे मिशन पूर्ण करण्यासाठी आणि तृणधान्यांमधून मिळणाऱ्या लाभांविषयी जास्तीत जास्त ग्राहकांना जागरूक करण्यासाठी टाटा कन्ज्युमर प्रोडक्ट्ससोबत आमचा सहयोग पुढे सुरु ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "इंडियन इन्स्टिट्यूट मिलेट रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये टाटा कन्ज्युमर सोलफुलने लॉन्च केली ‘मिलेट म्यूसली’ टाटा सोलफुलला ‘पोषक अनाज पुरस्कार २०२२’ बहाल केला"

Leave a comment

Your email address will not be published.


*