व्यावसायिक सौंदर्य करिअरला चालना देण्यासाठी नायका-प्रो तर्फे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मुंबई, २७ सप्टेंबर २०२२ (GNI): नायकाचा सौंदर्य व्यावसायिकांसाठीचा आशय आणि कॉमर्स प्लॅटफॉर्म नायका-प्रो ने द प्रोफेशनल मेकअप कोर्स नावाचा प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. सौंदर्य प्रशिक्षणात निपुण असलेल्या भारतातील अग्रगण्य एड-टेक प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या एअरब्लॅकच्या भागीदारीत तयार करण्यात आलेला प्रोफेशनल मेकअप कोर्स हा अशा सौंदर्य व्यावसायिकांसाठी आहे जे स्वत:चे कौशल्य वाढवण्याची आणि मेकअप ट्रेंड विकसित करण्यामध्ये पुढे राहण्याची संधी शोधत आहेत. हे सादरीकरण नायका-प्रो च्या भारतातील सौंदर्य व्यावसायिक समुदायाच्या वाढीसाठी गुंतवणूक करण्याच्या आणि पाठबळ देण्याच्या वचनबद्धतेला बळकटी देते.

८ आठवड्यांच्या नायका प्रो X एअरब्लॅक या प्रगत अभ्यासक्रमामध्ये वधूपासून ते अरेबियन ब्राइडल, फॅशन एचडी मेकअप, फॅन्टसी मेकअप, प्रोस्थेटिक्स आणि स्पेशल इफेक्ट्सच्या विविध लुकमध्ये थेट प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमामध्ये दोन मॉड्यूल्स देखील आहेत जे व्यावसायिकांना त्यांच्या इनस्टाग्राम पोर्टफोलिओ बिल्डिंगची कौशल्ये सुधारण्यास, प्रो व्हिडिओ आणि रील्स आणि क्लायंट व्यवस्थापनाची तत्त्वे तयार करण्यात मदत करतील. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सहभागींना एक प्रमाणपत्र मिळेल जे त्यांना नायका प्रो आणि एअरब्लॅक ब्युटी क्लब सदस्यत्वांमध्ये प्रवेश प्रदान करेल.

श्री.विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, बी-टू-बी व्यवसाय-नायका म्हणाले, “आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया प्रवाह आणि आशय सतत नवनवीन मेक-अप तंत्र आणि लूकची मागणी वाढवत आहे. या स्पर्धात्मक उद्योगात यशस्वी होण्यासाठी तसेच अग्रणी आणि सुसंगत राहण्यासाठी कौशल्य वाढवणे महत्त्वाचे आहे अशी माहिती आम्हाला आमच्या नायका प्रो समुदायातील सौंदर्य व्यावसायिकांनीही दिली. सौंदर्य व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी योग्य शिक्षण तयार करण्यात कुशल असलेल्या एअरब्लॅक सोबत भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. एकत्रितपणे या अभ्यासक्रमासह आमचे ध्येय अत्यंत स्पर्धात्मक सौंदर्य उद्योगात त्यांची भरभराट होण्यास मदत करणे आणि या प्रक्रियेत त्यांच्या व्यवसायाची वाढ, समृद्धी आणि ओळख निर्माण करणे हे आहे.”

२०१८ मध्ये सादर केलेले नायका प्रो हे आज भारतातील प्रमुख सदस्यत्व-अग्रणी आशय आणि वाणिज्य व्यासपीठ आहे. सौंदर्य व्यावसायिकांना व्यावसायिक उत्पादने, विशेष ऑफर आणि ब्रँड मास्टरक्लास यांच्या विस्तृत वर्गीकरणाची माहिती देणे आणि त्यायोगे त्यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे चालविण्यात मदत करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. नायका प्रो वर ६०,००० हून अधिक प्रमाणित सौंदर्य व्यावसायिकांनी त्यांच्या सर्व व्यावसायिक सौंदर्य गरजांसाठी विश्वास व्यक्त केला आहे. २७.८ हजारपेक्षा जास्त पिनकोड्समध्ये सर्वसमावेशक अनुभव सादर करत त्यांना ‘प्रो सोबत वाढण्यास’ सक्षम करत ४००० हून अधिक ब्रँड्समध्ये पसरलेल्या वर्गीकरणासह नायका-प्रो ला सौंदर्य व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यात सक्षम असल्याचा अभिमान आहे.ends GNI SG

Be the first to comment on "व्यावसायिक सौंदर्य करिअरला चालना देण्यासाठी नायका-प्रो तर्फे प्रमाणपत्र अभ्यासक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*