अपग्रॅड विद्यार्थ्यांना चौथ्या तिमाहीत मिळाली सरासरी ५४ टक्के वाढ, जागतिक उच्च एडटेक कंपनीमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांहून अधिक सीटीसीचा टप्पा पार केला

मुंबई, २७ जून २०२२ GNI): अपग्रॅड या आशियामधील अग्रणी एडटेक कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी–फेब्रुवारी–मार्च २०२२) त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ३२९ टक्क्यांच्या सर्वोच्च सीटीसी वाढीसह आणखी एका उपलब्धीची नोंद केली आहे. सरासरी सीटीसी देखील तिस-या तिमाहीत ५४ टक्क्यांनी वाढले आहे. डेटा सायन्स, मशिन लर्निंग, एमबीए, डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलेपमेंट या क्षेत्रांमध्‍ये सर्वाधिक करिअर बदल झाले.

या करिअर बदलांमध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामधील ३२९ टक्क्यांच्या सर्वोच्च सीटीसी वाढीचा समावेश आहे, त्यानंतर एमबीए क्षेत्रामधील ३०० टक्के आणि सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट क्षेत्रामधील २३३ टक्के वाढीचा समावेश आहे. अनेक अपग्रॅड विद्यार्थ्यांनी मशिन लर्निंग, एआय व डेटा सायन्‍स अशा इन-डिमांड कोर्सेससाठी वर्षादरम्‍यान १ कोटी रूपयांहून अधिक सीटीसी मर्यादेचा टप्पा देखील पार केला आहे. ज्यामधून ऑनलाइन उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये लक्षणीय बेंचमार्कची नोंद झाली. डिजिटल मार्केटिंग सारख्या क्षेत्रांसाठी सरासरी वाढ पूर्वीच्या ५० टक्क्यांवरून ६७ टक्क्यांपर्यंत वाढली, ज्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी ६१ टक्क्यांची वाढ झाली.

मयंक कुमार, सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, अपग्रॅड म्हणाले,”दररोज सकाळी उठल्यानंतर मला आमच्या विद्यार्थ्यांचे संदेश मिळतात, ज्यामध्ये त्यांना मिळालेल्या करिअरची माहिती असते. ज्यामधून मला उपलब्धीची भावना आणि अधिक परिश्रम घेण्यास प्रेरणा मिळते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी उच्च शिक्षण परिसंस्था निर्माण करण्याच्या दृढ विश्वासासह अपग्रॅडची सुरुवात केली आणि त्याचे नीश्चीत्तच वारंवार फळ मिळत आहे,”

अपग्रॅड भारतातील उच्च शिक्षण विभागातील एकमेव कंपनी आहे, जी दर्जेदार कन्टेन्ट शिक्षणाच्या रूपात सर्वांगीण शिक्षण अनुभव देण्यासोबत विद्यार्थ्यांना त्यांचे इच्छित व्यावसायिक परिणाम संपादित करण्यामध्ये सक्षम देखील करते. जागतिक अग्रणी एडटेक कंपनीसह कोर्स पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट विभागातील प्रमुख कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे, जसे असेंचर, डिलाईट, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, अमेझॉन आणि पब्लिकीस मीडिया ग्रुप. विकासगती मध्ये अधिक भर करत अपग्रॅडने त्यांच्या विद्यर्थ्यांना जारी केलेल्या प्रतिवर्षी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक ऑफर्स मध्ये ३० टक्क्यांची वाढ देखील केली आहे.

हुसैन टिनवाला, सह-संस्थापक, अपग्रॅड-रिक्रूट म्हणाले,”अपग्रॅडमध्‍ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या आरओआयला चालना देणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे राहिले आहे. आमचे रिक्रुटिंग तज्ज्ञांचे व्यापक नेटवर्क अपग्रॅड विद्यार्थ्यांना नियुक्तीच्या संदर्भात बाजारपेठेत मंदीचे वातावरण असण्याच्या काळात देखील व्यापक प्लेसमेंट संधी आणि आकर्षक पॅकेजेस देण्यामध्ये यशस्वी ठरले आहे. सर्वोत्तम आस्थापनासह विविध मागदर्शन उपक्रमांनी आम्हाला भविष्यासाठी सुसज्ज दर्जेदार व्यावसायिक निर्माण करण्यास मदत केली आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "अपग्रॅड विद्यार्थ्यांना चौथ्या तिमाहीत मिळाली सरासरी ५४ टक्के वाढ, जागतिक उच्च एडटेक कंपनीमधील विद्यार्थ्यांनी आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांहून अधिक सीटीसीचा टप्पा पार केला"

Leave a comment

Your email address will not be published.


*