“जागतिक पर्यावरण दिनी, टाटांचे एआय-पॉवर्ड पीआयआर मोशन सेन्सर सादर” ग्राहकांना ऊर्जेचे संवर्धन करता यावे, वीजबिलामध्ये बचत करता यावी यासाठी टाटा पॉवरने हरित पाऊल उचलले

मुंबई, ६ जून २०२२ (GNI): भारतातील एक सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी, टाटा पॉवरने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत टाटा पॉवर ईझेड होम या आपल्या होम ऑटोमेशन श्रेणीमध्ये नवीन एआय-पॉवर्ड पीआयआर (पॅसिव्ह इन्फ्रारेड) मोशन सेन्सर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांना ऊर्जेचे संवर्धन करता यावे, वीजबिलामध्ये बचत करता यावी यासाठी आपले #DoGreen वचन अधोरेखित करत टाटा पॉवरने हे हरित पाऊल उचलले आहे.

पीआयआर (पॅसिव्ह इन्फ्रारेड) मोशन सेन्सर त्याला जोडलेले उपकरण ५ मीटर कक्षेमध्ये मानवी हालचाली ओळखून त्यानुसार नियंत्रित करतो. बीईई संशोधन अहवालानुसार, टाटा पॉवर ईझेड होम पीआयआर मोशन सेन्सरमध्ये त्याला जोडलेल्या घरगुती उपकरणाच्या वीज वापरापैकी ४०% पर्यंत विजेची बचत करण्याची क्षमता आहे. आधीच्या ईझेड होम सुविधांबरोबरीने हा सेन्सर देखील सरकारने निवासी इमारतींसाठी लागू केलेल्या ऊर्जा बचत संहिता सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टीने अनुरूप आहे.

एआय-चालित ऊर्जा सुविधांबद्दल टाटा पॉवरच्या प्रवक्त्याने सांगितले, “जागतिक पर्यावरण दिनी, आमचा एआय-पॉवर्ड पीआयआर मोशन सेन्सर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या एआय सेन्सर्सचा वापर करून आमचे जागरूक व चोखंदळ ग्राहक ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जेचा अधिकाधिक सक्षम वापर करण्याबाबत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील व आम्हाला आमच्या #DoGreen अभियानात साथ देऊ शकतील.”

टाटा पॉवर ईझेड होममध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची होम ऑटोमेशन, आयओटीवर आधारित उत्पादने आहेत, यामध्ये मॉड्युलर स्विचेस, कन्व्हर्टर्स, कंट्रोलर्स इत्यादींचा समावेश असून यांच्या साहाय्याने युजर्स अगदी सहजपणे त्यांची घरगुती उपकरणे कुठूनही संचालित व नियंत्रित करू शकतात. अनोख्या एनर्जी अनॅलिटीक्स वैशिष्ट्यांमुळे ही उत्पादने युजर्सना त्यांच्या वास्तविक आणि संभाव्य ऊर्जा वापराची माहिती पुरवतात, यामध्ये उत्पादन, खोली आणि घर अशा विविध स्तरांवरील ऊर्जा वापराबाबत माहिती मिळते. रिअल-टाइम डेटामुळे ग्राहकांना संबंधित टॅरिफ स्लॅबमध्ये राहण्यात मदत मिळते आणि प्रत्यक्षात बचत करता येते. टाटा पॉवर ईझेड होम मोबाईल ऍपमध्ये त्याच श्रेणीतील स्टार-रेटेड इलेक्ट्रिक उपकरणाच्या तुलनेत ऊर्जा वापर किती आहे त्याची माहिती देखील दर्शवली जाते. अशा प्रकारच्या तुलनेमुळे ऊर्जा सक्षमतेसंदर्भात काही समस्या असल्यास त्या समजून येतात व उपकरणांसाठी देखभाल उपाययोजना करता येतात.

टाटा पॉवर ईझेड होम सोल्युशन्समध्ये उत्पादनांच्या स्मार्ट आणि वापरायला सहासोप्या श्रेणी सादर करण्यात आल्या आहेत, आधीपासूनचे इलेक्ट्रिकल सेटअप न बदलता ही उत्पादने अगदी सहज इन्स्टॉल करता येतात. ग्राहक टाटा पॉवर ईझेड होम ऍप इन्स्टॉल करू शकतात किंवा आपल्या स्मार्टफोनवर एका बटनाला स्पर्श करून देखील उत्पादने चालवू शकतात किंवा अलेक्सा अथवा गूगल असिस्टंटवर व्हॉइस कमांड्स देऊन देखील उपकरणे चालवली जाऊ शकतात किंवा रिमोटमार्फत उत्पादनांचे संचालन करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे प्रत्येक स्विच आणि उपकरण कनेक्टेड डिव्हाईस म्हणून वापरले जाऊ शकते.ends GNI SG

Be the first to comment on "“जागतिक पर्यावरण दिनी, टाटांचे एआय-पॉवर्ड पीआयआर मोशन सेन्सर सादर” ग्राहकांना ऊर्जेचे संवर्धन करता यावे, वीजबिलामध्ये बचत करता यावी यासाठी टाटा पॉवरने हरित पाऊल उचलले"

Leave a comment

Your email address will not be published.


*