डेटा सायन्स आणि बिझनेस अॅनालिटिक्स तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी सिटीअस टेकचा बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपी बरोबर करार

मुंबई, १ जून २०२२ (GNI): आघाडीचे आरोग्यसेवा तंत्रज्ञान आणि सल्ला सुविधा पुरवठादार सिटीअस टेकने डेटा सायन्स आणि विश्लेषण तंत्रज्ञानातील त्यांच्या तंत्रज्ञान व्यावसायिकांना कौशल्यात वाढ व्हायला मदत करण्यासाठी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानीच्या वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (WILP) विभागासोबत भागीदारी केली आहे. सिटीअस टेकचे अभियंते त्यांचे आरोग्य सेवा आणि गुणवत्ता विश्लेषण कौशल्य मजबूत करण्यासाठी आता बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपीच्या एमटेक डेटा विज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच व्यवसाय विश्लेषणामध्ये एमबीए सारख्या आघाडीच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊ शकतात.डब्ल्यूआयएलपी हा जवळपास चार दशकांपासून बिट्स पिलानीचा एक अग्रगण्य आणि अविभाज्य विभाग आहे आणि कार्यरत व्यावसायिकांना त्यांच्या संबंधित संस्थांसाठी काम करत असताना इतर क्षेत्रांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढविण्यात मदत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

ग्लोबल बिग डेटा अँड बिझनेस अॅनालिटिक्स (जीबीडीबीए) मार्केट रिपोर्टच्या निष्कर्षांनुसार, आरोग्यसेवा विश्लेषण बाजारपेठ २०२१ मध्ये अंदाजे २१ बिलियन डॉलर वरून २०२६ पर्यंत ७५ बिलियन डॉलर पर्यंत आणि या अंदाज कालावधीत २९% च्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) पोहोचण्याचा अंदाज आहे. जीबीडीबीएचा आकार २०२७ पर्यंत ४४८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे आकडे या वस्तुस्थितीचे समर्थन करतात की मूल्य-आधारित आरोग्यसेवेची वाढ ही एक मोठी संधी असेल आणि त्यामुळे आरोग्य सेवा संस्थांना विश्लेषणामध्ये लक्षणीय गुंतवणूक करण्याची संधी मिळते. सिटीअस टेकला देखील याची जाणीव आहे की या बाजारपेठेतील क्षमतेचा फायदा घेण्यासाठी, संस्थेमधील काही व्यावसायिकांना काही आघाडीच्या अध्यापन आणि शिक्षण अभ्यासक्रमांद्वारे सतत स्वत:चे कौशल्य वाढवणे आवश्यक आहे.

सिटीअस टेकला बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपीच्या परिवर्तनशील अध्यापन अभ्यासक्रमाचा फायदा होईल जो अनेक वर्षांचे अभ्यासक्रम सादर करतो. हे अभ्यासक्रम संस्था आणि त्यांच्या संबंधित उद्योगांसाठी विशेषकरून तयार केले जातात. यामध्ये व्हर्च्युअल आणि रिमोट लॅबमध्ये पूर्णतः कार्यशील आणि वारंवार देखभाल केलेली उपकरणे आणि सॉफ्टवेअर वापरले जाते. वर्षभर विद्यार्थ्यांसाठी हे खुले असते. सिटीअस टेकच्या सध्याच्या अभियांत्रिकी आणि सल्लागार कार्यशक्तीसाठी एक आदर्श पर्याय तयार करून शिकणार्‍यांच्या सोयीनुसार हँडआउट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स देखील पुरविते.

बिट्स पिलानीचे ऑफ-कॅम्पस प्रोग्राम्स अँड इंडस्ट्री एंगेजमेंटचे संचालक प्रा. जी. सुंदर म्हणाले, “बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपीमध्ये आम्ही कार्यरत व्यावसायिकांना आवश्यक ज्ञान प्रदान करणारे कार्यक्रम विकसित करण्यासाठी आणि उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये त्यांच्यामध्ये रुजविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, डेटा सायन्स आणि अभियांत्रिकी आणि बिझनेस अॅनालिटिक्स या क्षेत्रातील आमच्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांद्वारे सिटीअस टेक सोबत भागीदारी करण्यात आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमांचा उद्देश नोंदणीकृत व्यक्तींना (सिटीअस टेक मधील) नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे आणि आरोग्यसेवे सारख्या विशिष्ट उद्योगातील बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन या आधुनिक तंत्रज्ञानासाठी तयार करणे आहे.”ends GNI SG

Be the first to comment on "डेटा सायन्स आणि बिझनेस अॅनालिटिक्स तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी सिटीअस टेकचा बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपी बरोबर करार"

Leave a comment

Your email address will not be published.


*