‘ईट राईट फूड संमेलन २०२२’ चे आयोजन, ईट राईट इंडिया अभियानाच्या समर्थनाने चालवला जात असलेला हर्बालाईफ न्यूट्रिशनचा उपक्रम

मुंबई, २७ एप्रिल २०२२ (GNI): पोषण क्षेत्रात काम करणारी, जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी हर्बालाईफ न्यूट्रिशनने ‘ईट राईट फूड संमेलन २०२२’ चे आयोजन केले होते. या धोरणात्मक मंचावर ईट राईट इंडिया अभियानांतर्गत निरोगी भविष्यासाठीचे विषय निश्चित करण्यासाठी सरकार, राजकारण आणि खाजगी क्षेत्रातील हितधारकांना एकत्र आणले गेले होते, ज्याचा उद्देश खाद्य दुकानांच्या पायाभूत संरचनेमध्ये सुधारणा घडवून आणून, सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार पर्यायांना प्रोत्साहन देणे व असे पर्याय उपलब्ध करवून देणे, तसेच खाद्य पदार्थ बनवणाऱ्यांच्या व ग्राहकांच्या जागरूकतेमध्ये, कौशल्यांमध्ये वाढ करणे हा आहे.

हर्बालाईफ न्यूट्रिशनचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट व इंडिया कंट्री हेड श्री अजय खन्ना यांनी सांगितले, “एक कंपनी म्हणून आम्हाला आमच्या ईट राईट अभियानावर काम करताना खूप अभिमान वाटत आहे, हे अभियान भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ ला पूरक असून यामध्ये संपूर्ण लक्ष प्रतिबंधात्मक व प्रोत्साहक आरोग्य देखभाल आणि प्रमुख कार्यक्रमांवर केंद्रित करण्यात आले आहे. निरोगी जीवनशैली व पोषण या दोन बाबींवर आमचा ठाम विश्वास असून आम्ही मानतो की भारताला निरोगी बनवण्याचा लक्ष्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सीईओ श्री.अरुण सिंघल यांनी सांगितले, “सर्व भारतीयांसाठी सुरक्षित व पौष्टिक जेवण उपलब्ध होत राहावे यासाठी एक खाद्य प्रणाली दृष्टिकोन अवलंबून एफएसएसएआयने गेल्या काही वर्षात आपले नियामक नेतृत्व दाखवून दिले आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वेळी आणि सदैव सुरक्षित, निरोगी आणि सदासर्वकाळ मिळत राहील असा आहार मिळावा यासाठी देशाच्या खाद्य प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालवले जात असलेले राष्ट्रीय आंदोलन ही ईट राईट इंडियाची ओळख आहे. आजवरच्या यशाचा सन्मान करणे एवढाच याचा उद्देश नाही तर आपणा सर्वांच्या निरोगी भविष्यासाठी उपाययोजनांसह विचार करण्याचा एकात्मिक मंच देखील आहे. भविष्याची रूपरेखा तयार करण्यासाठी हितधारकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त संवादामार्फत सहयोग मजबूत करणे हा अशा प्रकारच्या संमेलनांचा व मंचांचा उद्देश आहे.

हर्बालाईफ न्यूट्रिशनमार्फत चाळीस कॅम्पसेसमध्ये ईट राईट अभियानाच्या अंमलबजावणीला साहाय्य केले जाते, यामध्ये राज्य सचिवालये, इसरो कॅम्पस, पोलीस प्रशिक्षण केंद्र, वायू सेना कॅम्प, विद्यापीठे, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानके यांचा समावेश आहे. निरोगी जीवनाचा एक भाग म्हणून योग्य आहार घेण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना जागरूक करण्यात मदत करण्यासाठी हर्बालाईफ न्यूट्रिशनने देशभरात जागरूकता कार्यक्रमांची एक शृंखला देखील चालवली. डिसेंबर २०२१ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पामध्ये १७ मास कँटीन आधीच सहभागी झाली आहेत. त्यामध्ये हुबळी रेल्वे स्टेशन, मदुराईमध्ये केंद्रीय कारागृह, भारत-तिबेट पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, पुण्यामध्ये आयएएस अकॅडेमी, इसरो कॅम्पस इत्यादींचा समावेश असून, यावरून दिसून येते की याचा उद्देश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचणे हा आहे.ends

Be the first to comment on "‘ईट राईट फूड संमेलन २०२२’ चे आयोजन, ईट राईट इंडिया अभियानाच्या समर्थनाने चालवला जात असलेला हर्बालाईफ न्यूट्रिशनचा उपक्रम"

Leave a comment

Your email address will not be published.


*