Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - Godrej Agrovet Reiterates its Commitment to Handhold Indian Farmers on Kisan Diwas - "Mother's Embrace" A Photography Exhibition will be displayed by Renowned Photographer Devendra Naik at Jehangir Art Gallery in Mumbai - DAM Capital Advisors collects Rs 251 cr from Anchor Investors - Blackstone backed Ventive Hospitality Limited raises ₹ 719.55 Crores from 26 anchor investors at the upper end of the price band at ₹643 per equity share - The Inventurus Knowledge Solutions Limited listing ceremony held at NSE today - “ENCOUNTER WITH THE MOMENT” An Exhibition of Photographs by Gurdeep Dhiman at Jehangir Art Gallery in Mumbai - VENTIVE HOSPITALITY LIMITED ANNOUNCED ITS Rs. 16,000 MILLION INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON FRIDAY, DECEMBER 20, 2024 Sets Price Band fixed at Rs. 610 to Rs. 643 per equity share of face value of Rs. 1 each - Dr Agarwals Eye Hospital, Chembur, launches advanced laser system for precise and bladeless corneal surgery, Renowned actress Saiee Manjrekar inaugurates the state-of-the-art WaveLight FS200 Femtosecond Laser System - DAM Capital Advisors Limited announced its initial public offering (IPO) to open on Thursday, December 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 269/- per equity share to ₹ 283/- per equity share of the face value of ₹2 each - TRANSRAIL LIGHTING LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY, DECEMBER 19, 2024 Sets Price Band has been fixed at ₹ 410.00 to ₹ 432.00 per equity share, of face value ₹2 each

फायर सेफ्टी असेसमेंट/ऑडिट सादर करण्यासाठी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांचे एकत्रीकरण

Mumbai, 19th April 2022 (GNI): गोदरेज फायर रिस्क अॅसेसरच्या अनावरणप्रसंगी एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित राघवन, मुंबई अग्निशमन दलाचे डेप्युटी सीएफओ श्री दीपक घोष, एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. संतोष एस. वारिक आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे  संचालक श्री सुरेश मेनन, एफएसएआय नॅशनल इव्हेंट चेअरमन, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव श्री अशोक मेनन आणि गोदरेज सिक्युरिटी सोल्युशनचे व्यवसाय प्रमुख श्री पुष्कर गोखलेउपस्थित होते. – photo by Sumant Gajinkar (GNI)

·         गोदरेज फायर रिस्क अॅसेसर हे उपक्रमाचे नाव

·         व्यावसायिक आस्थापनांसाठी मुंबईत पथदर्शी प्रकल्प सुरू होणार

मुंबई, १९ एप्रिल २०२2 (GNI): भारतातील अग्रगण्य गृह आणि संस्थात्मक सुरक्षा उपाय ब्रँड असलेल्या गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स (जीएसएस) यांनी आज फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) सोबत सहयोगाची घोषणा केली. सानुकूलित अग्निसुरक्षा मोजमाप सादर करण्यासाठी हा सहयोग करण्यात आला असून त्यायोगे आस्थापनांना अग्नि अनुपालन म्हणून ओळखता येईल. हा उपक्रम गोदरेज फायर रिस्क अॅसेसर म्हणून ओळखला जाणार आहे.

गोदरेज फायर रिस्क अॅसेसरच्या अनावरणप्रसंगी एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित राघवन, मुंबई अग्निशमन दलाचे डेप्युटी सीएफओ श्री दीपक घोष, एमआयडीसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. संतोष एस. वारिक आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवेचे  संचालक श्री सुरेश मेनन, एफएसएआय नॅशनल इव्हेंट चेअरमन, फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव श्री अशोक मेनन आणि गोदरेज सिक्युरिटी सोल्युशनचे व्यवसाय प्रमुख श्री पुष्कर गोखले  उपस्थित होते.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे व्यवसाय प्रमुख श्री पुष्कर गोखले म्हणाले, “संस्थांच्या इमारती अग्निशमन अनुरूप आहेत की नाही हे समजून घेण्याची तीव्र गरज आहे. वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर, अग्निसुरक्षित परिसंस्था तयार करताना आम्ही ज्या प्रकारे जागा तयार करतो त्याप्रमाणे प्रणालीगत समायोजन करणे महत्त्वाचे आहे. अंमलबजावणीच्या पातळीवर  आस्थापना अग्निशमन पूरक आहेत याची खात्री करण्यासाठी, नियमित मूल्यमापन करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच हा दृष्टिकोनात्मक बदल आणण्यासाठी आणि संस्थाना त्यांचे लोक आणि त्यांची मालमत्ता सुरक्षीत राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही एफएसएआय सोबत भागीदारी करत आहोत. निवासी सोसायट्यांसाठी पण हे तितकेच गंभीर आहे. विशेषत: उंच इमारतींना आग लागण्याच्या घटनांचा धोका अधिक असतो. सुरक्षा उद्योगातील अग्रणी म्हणून भारताला अग्निसुरक्षा राष्ट्र बनण्यास मदत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजित राघवन म्हणाले, “आम्हाला गोदरेज फायर रिस्क अॅसेसर हा महत्वाचा उपक्रम तयार करण्यासाठी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सशी सहकार्य करताना आनंद होत आहे. एफएसएआय भारतातील सर्व नागरिकांमध्ये सुरक्षित जीवन जगण्याची भावना वाढवण्यावर विश्वास ठेवतो आणि नेहमी एक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी कृतीशील मानसिकता रुजवितो. त्यामुळेच गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स सारखा ब्रँड हे पाऊल उचलत आहे याचे आम्ही कौतुक करतो. आम्हाला विश्वास आहे की यामुळे नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.”

अग्निसुरक्षित परिसंस्थेसाठी ब्रँडच्या वचनबद्धतेचा दाखला म्हणून अनुदानित दरांवर फायर ऑडिट केले जाईल.

बहुतेकदा इमारतीची रचना आणि योग्य पद्धत समजून घेण्याचा अभाव यामुळे देशभरातील बहुतेक पायाभूत सुविधा आगीच्या धोक्याच्या दृष्टीने असुरक्षित आहेत.  आगीच्या धोक्यामुळे जीवितहानीच्या जोडीलाच मालमत्ता, मौल्यवान कागदपत्रे, दागिने यांचेही मोठे नुकसानावर होते.

#BeFireSafeThanSorry या संपूर्ण मोहीमेत गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचे उद्दिष्ट नागरिक आणि तज्ञांमध्ये आगीच्या धोक्यांशी लढण्यासाठी सुरक्षा उपायांचा सक्रिय अवलंब वाढवणे हे आहे. मुंबई अग्निशमन विभागाने गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स आणि एफएसएआय यांना अग्निसुरक्षेसाठीचे योद्धे म्हणून नावाजले असून या उपक्रमासाठी त्यांचे कौतुक केले आहे.

About Godrej Security Solutions is a division of Godrej & Boyce Mfg. Co. Ltd and part of the USD 4.1 billion Godrej Group. A pioneer and leader in the business, Godrej Security Solutions Division is the largest manufacturer and marketer of Security Solutions in India. It is the largest supplier of security solutions to several prestigious banking, corporate and public institutions. For the first time in the category and the industry, Godrej Security Solutions Division has been awarded the Superbrand status. It has also won the “Most Preferred brand” award in the Home Segment. The Division currently exports its products to over 45 countries including Middle East Asia, South East Asia, Far East Asia, East Africa, the US, Europe and the SAARC Countries.ends

Be the first to comment on "फायर सेफ्टी असेसमेंट/ऑडिट सादर करण्यासाठी गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स आणि फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांचे एकत्रीकरण"

Leave a comment

Your email address will not be published.


*