जॉन्स हॉपकिन्स गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूट भारतातील दिग्गज कॉर्पोरेट्सच्या सहयोगाने भारतात संशोधन आणि नावीन्य क्षेत्राला अधिकाधिक मजबुती प्रदान करणार

मुंबई, ४ एप्रिल २०२२ (GNI): गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूटच्या (GKII) स्थापनेमुळे भारत आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्यातील संबंधांनी नवी उंची गाठली आहे. GKII (जीकेआयआय) ही संस्था जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वपूर्ण, प्रभावशाली प्रयत्नांवर ७ युनिव्हर्सिटी स्कूल्समधील १६५ पेक्षा जास्त प्राध्यापक आणि भारतीय सहयोग्यांच्या दरम्यान बहुआयामी कार्याला प्रोत्साहन देते. GKII (जीकेआयआय) च्या नेतृत्व फळीतील एक शिष्टमंडळ भारतभेटीवर आले असून सध्याचे आणि संभावित सहयोगी यांच्यासोबत चर्चा व पॅनल चर्चांच्या माध्यमातून हे बंध अधिक मजबूत करत आहे.  पहिला पॅनल कार्यक्रम मुंबईत आज पार पडला ज्यामध्ये संशोधन व नावीन्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा व नव्या संधींचा शोध घेण्यात आला. “टेक फॉर गुड: इंडिया आयएनसीज् कमिटमेंट टू रिसर्च अँड इनोव्हेशन” या सत्रामध्ये भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते.

प्रमुख वक्ते व युआयडीएआयचे सीईओ डॉ सौरभ गर्ग तसेच चर्चेमध्ये सहभागी झालेले पॅनलिस्ट्स भारत बायोटेकच्या सह-संस्थापक व सह-व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सुचित्रा एला, दसराच्या व्यवस्थापकीय भागीदार व संस्थापक श्रीमती नीरा नंदी, आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. सुभासिस चौधुरी, वाधवानी एआयचे सीईओ श्री. शेखर शिवसुब्रमण्यम आणि फ्रुटफलचे संस्थापक व सीईओ श्री विरेश प्रशर यांनी नव्या संधी निर्माण करण्यात,  वेगवेगळ्या शाखांदरम्यान ज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीतील अडसर कमी करण्यात आणि भविष्यात उपयुक्त ठरेल अशा नव्या तंत्रज्ञानाला आकार देण्यात खाजगी क्षेत्राची भूमिका अधोरेखित केली.

संशोधन आणि विकास क्षेत्रात भारतात दरवर्षी ४८ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाते, संपूर्ण जगभरातील ही सातव्या क्रमांकाची सर्वाधिक गुंतवणूक आहे. पण देशाच्या जीडीपीच्या तुलनेत याचे प्रमाण ०.७% असल्याने त्या यादीतील पहिल्या १५ मध्ये भारताला स्थान मिळवणे शक्य झालेले नाही, संशोधन व विकासामध्ये आपले योगदान वाढवून खाजगी क्षेत्र ही कमतरता भरून काढू शकते. एकूण राष्ट्रीय संशोधन व विकास खर्चामध्ये भारतातील खाजगी क्षेत्राचे योगदान ३७% आहे, चीन आणि जपानमध्ये ही टक्केवारी ७७%, युनायटेड स्टेट्समध्ये ७१% तर जर्मनीत ६८% आहे. एकमेकांच्या सहयोगाने काम केल्यास विज्ञानामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करता येईल, संशोधन व नावीन्यामध्ये भागीदारींना प्रोत्साहन दिले जाईल व संशोधन विकासामध्ये खाजगी क्षेत्राचा समावेश वाढेल.

युआयडीएआयचे सीईओ व प्रमुख वक्ते डॉ सौरभ गर्ग यांनी सांगितले, “भारत सरकारने महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारींवर नेहमीच भर दिला आहे. स्टार्ट-अप आणि औद्योगिक धोरण या दोन्हींमध्ये संशोधन व विकास महत्त्वाचा भाग बनावा यावर आमचा भर आहे. प्रयोगशाळा ते संशोधनापर्यंत घेऊन जाणारे मार्ग निर्माण करणे हा सरकारच्या भूमिकेचा एका महत्त्वाचा भाग असेल.” 

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रोव्होस्ट डॉ सुनील कुमार यांनी सांगितले, संशोधनामध्ये खाजगी क्षेत्राच्या योगदानावर भर देण्यात आल्याने भारतामध्ये नवचाराला प्रोत्साहन दिले जाईल, त्याबरोबरीनेच जागतिक पातळीवरील संशोधनासाठी भारतातील संशोधन इकोसिस्टिम अधिक जास्त आकर्षक बनवली जाईल.  जगभरात इतरत्र शिकवत असलेल्या किंवा काम करत असलेल्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी भारतात परतून याठिकाणी आपल्या प्रयोगशाळा उभाराव्यात यासाठी त्यांना प्रोत्साहनपर लाभ देणे देखील महत्त्वाचे आहे. आम्ही असे मानतो की, हे सर्व घडून येण्यासाठी उद्योगक्षेत्र सरकार व शिक्षणक्षेत्राच्या समन्वयाने काम करू शकते.” 

शाश्वत, पर्यावरणपूरक सामाजिक प्रभाव घडवून आणण्यासाठी वापरले जाऊ शकतील अशा उच्च दर्जाच्या, उपायांवर आधारित उपक्रमांवर काम करण्यासाठी आणि शिकण्यासाठी खाजगी क्षेत्रासोबत समन्वय व सहयोग करण्यासाठी जॉन्स हॉपकिन्सचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हा गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूटचा एक उद्देश आहे. प्रमुख हितधारक म्हणून भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रासोबत समन्वयातून नव्या संकल्पना आणि भागीदारी निर्माण करणे, स्थानिक, आंतरराष्ट्रीय व शैक्षणिक संसाधनांचा उपयोग करवून घेणे आणि बहुशाखीय शिक्षण संधींना प्रोत्साहन देणे  हे उद्देश साध्य करता येतील.     

About Gupta-Klinsky India Institute at Johns Hopkins University works with leaders across Indian government, academia, civil society, and private sector to advance human knowledge and develop bold, world-changing ideas. With more than 165 JHU faculty partnering with experts from 100+ Indian institutions, the Institute supports enduring, meaningful, multidisciplinary work that both addresses national priorities and has high potential for global impact. Through generous grants, GKII supports doctoral students focusing on maternal and child health in India. The Institute also works to offer online, in-person, hybrid courses tailored for executive education, certificate courses, and doctoral and master’s programs, as well as supporting bilateral faculty and student exchange. The Institute is supported in part by Raj and Kamla Gupta and Steve and Maureen Klinsky. To learn more, visit:  https://indiainstitute.jhu.edu/

Be the first to comment on "जॉन्स हॉपकिन्स गुप्ता-क्लिंस्की इंडिया इन्स्टिट्यूट भारतातील दिग्गज कॉर्पोरेट्सच्या सहयोगाने भारतात संशोधन आणि नावीन्य क्षेत्राला अधिकाधिक मजबुती प्रदान करणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*