टायगर श्राॅफच्या “गणपत’ची “कु’ अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा

Mumbai, 24th December 2021 (GNI): प्रतिनिधी : “कु’ स्वदेशी अॅपवरील पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या “गणपत’ची आतापासूनच चर्चा आहे. खरे तर हा चित्रपट पुढील नाताळला म्हणजे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, “कु’ अॅपवरील टिझरमुळे टायगरचे चाहते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. टायगर “कु’वर नवा व्हिडीओ कधी पोस्ट करतो याची त्याचे चाहते चातकासारखी वाट पाहात असतात.

टायगर अॅक्टिंग इतकाच त्याच्या डान्ससाठीही फेमस आहे. “कु’मुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांत वाढ झाली आहे. कोरीयन पाॅप डान्सर काईने टायगरला एका गाण्यावर डान्स करून दाखवण्याचे चॅलेंज केले. आणि टायगरनेही ते सहज स्वीकारीत पूर्ण केले. काईने दिलेल्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ टायगरने “कु’वर पोस्ट केला आहे. पाहता पाहता लाखो लोकांपर्यत व्हिडीओ व्हायरल झाला. सध्या सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे.Check this post from @iTIGERSHROFF on Koo App:
“When the king of kpop dance Kai asks you to do his challenge…”https://www.kooapp.com/koo/iTIGERSHROFF/33f027b8-fed3-4e1a-bd2a-4908ebb7e3c7
Download Koo App
https://www.kooapp.com/dnld

Be the first to comment on "टायगर श्राॅफच्या “गणपत’ची “कु’ अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा"

Leave a comment

Your email address will not be published.


*