‘ईसीएमओ’ थेरपीने कोरोना ग्रस्त फुफ्फुस पुनः कार्यंवित कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अपोलो हॉस्पिटल्सने सर्वात जास्त रुग्णांना फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यास मदत केली

नवी मुंबई, २२ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सीजनेशनचा उपयोग करण्यात (२०१०सालापासून) आघाडीवर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयंकर काळात अपोलो हॉस्पिटल्स टीमने भारतात सर्वात जास्त रुग्णांना फुफ्फुसांचे कार्य पुन्हा पूर्ववत होण्यात यशस्वीपणे मदत केली आणि अनेक विक्रम मोडले आहेत. ईसीएमओ म्हणजे काय? यामध्ये रुग्णाचे रक्त मोठ्या वाहिन्यांच्या आत (हृदयाच्या जवळ) बसवण्यात आलेल्या मोठ्या ट्यूब्सच्या मदतीने शुद्ध आणि ऑक्सिजनेटेड केले जाते आणि एका पंपाच्या साहाय्याने परत पाठवले जाते. कोरोनाच्या बहुतांश रुग्णांच्या फुफ्फुसांचे कार्य थांबते, त्यांना फुफ्फुसांच्या कार्यासाठी मदत पुरवण्याची गरज असते. अगदीच कमी रुग्णांच्या बाबतीत हृदयाच्या कार्याला सहायता पुरवण्यासाठी याची गरज भासते.

अपोलो हॉस्पिटल्समध्ये देशातील सर्वात आधुनिक ईसीएमओ युनिट आहे, याठिकाणी २०१० सालापासून २७० पेक्षा जास्त ईसीएमओ रुग्णांवर यशस्वी उपचार केले गेले आहेत. ईसीएमओचा वापर अनेक वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये केला जातो, ज्यामध्ये विषाचा प्रभाव, आघात, एच१एन१ सारखे संसर्ग, प्रत्यारोपणाच्या आधी आणि त्यानंतरच्या काही काळात आणि अगदी नुकत्याच केसेस म्हणजे कोरोनाचा समावेश आहे. ज्यांच्यावर पारंपरिक व्हेंटिलेटर थेरपीने उपचार करणे शक्य नाही अशा रुग्णांमध्ये ईसीएमओ थेरपी खूप प्रभावी ठरते असे आढळून आले आहे. अपोलो ईसीएमओ युनिटने आजवर जितके विक्रम केले आहेत त्यामध्ये फुफ्फुसांचे कार्य संपूर्णपणे पूर्ववत होण्याआधी रुग्णाला ईसीएमओवर ११६ दिवस (रुग्णालयात भरती असल्याचे एकूण दिवस १८३) ठेवले गेल्याची केस देखील आहे. याशिवाय काही इतर विक्रमांमध्ये ६० दिवसांचा सर्वाधिक सरासरी कालावधी आणि तीन महिन्यांनंतर ज्यांच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत सुरु झाले अशा रुग्णांची सर्वाधिक संख्या यांचा देखील समावेश आहे.

माध्यमांना माहिती देताना अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टन्ट कार्डिओथोरेसिक अँड हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. पॉल रमेश यांनी सांगितले, “डिस्चार्जच्या आधी ईसीएमओचा सरासरी कालावधी ६० दिवस आहे. ईसीएमओ रुग्णांचा जिवंत राहण्याचा सध्याचा दर (६ महिन्यांपर्यंत) ७३.९ टक्के आहे, जो जागतिक सरासरी म्हणजे ४०-५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या ईसीएमओ कार्यक्रमाच्या सर्वात प्रभावी परिणामांमध्ये अशा रुग्णाचा समावेश आहे जो ११६ दिवसांपर्यंत ईसीएमओवर होता, रिकव्हरी होईपर्यंत रुग्णाला ईसीएमओवर ठेवण्याचा हा भारतातील सर्वाधिक कालावधी आहे. ईसीएमओचा वापर करून आमच्या असे लक्षात आले की, ज्यांच्या फुफ्फुसांचे खूप नुकसान झाले आहे असे बहुतांश रुग्ण देखील संपूर्णपणे बरे होतात, त्यामुळे फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याची गरज उरत नाही.”

अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर कन्सल्टन्ट कार्डिओथोरेसिक अँड हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. के. मधनकुमार यांनी सांगितले, “अवेक ईसीएमओ हे आमच्या टीमला मिळालेल्या अनेक कारणांपैकी एक आहे, यामध्ये रुग्ण जागा राहू शकतो, त्यामुळे आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतो, बोलू शकतो, अशाने रुग्णांचे मनोबल वाढते, त्यांच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होण्याच्या आणि उपचारांचे अधिक चांगले परिणाम घडून येण्याच्या शक्यता वाढतात. ईसीएमओच्या रुग्णांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते आणि मशीन काढल्यानंतर त्यांना संपूर्णपणे सक्रिय करण्यासाठी फिजिओथेरपी दिली जाते.Ends

Be the first to comment on "‘ईसीएमओ’ थेरपीने कोरोना ग्रस्त फुफ्फुस पुनः कार्यंवित कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अपोलो हॉस्पिटल्सने सर्वात जास्त रुग्णांना फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यास मदत केली"

Leave a comment

Your email address will not be published.


*