अपोलोत ‘डायबेटिक फूट क्लिनिक्स’, डायबेटिक फूट क्लिनिक मधुमेही पायाची लक्षणे ओळखूण मधुमेहावरील उपचाराचे योग्य व्यवस्थापन करेल

नवी मुंबई, १८ नोव्हेंबर २०२१ (GNI): अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने आज समर्पित अपोलो डायबेटिक फूट क्लिनिक्सची सुरुवात केली असून, त्यापैकी पहिले क्लिनिक ‘जागतिक मधुमेह दिनी’ सुरू केले आहे. मल्टिडिसिप्लिनरी टीमसह समर्पित अपोलो डायबेटिक फूट क्लिनिक डायबेटिक फूटच्या उपचारांमध्ये सर्वतोपरी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक देखभाल सेवा प्रदान करेल. समर्पित अपोलो डायबेटिक फूट क्लिनिक मधुमेही पायाची लक्षणे लवकर ओळखण्यात आणि मधुमेहावरील उपचार, देखभालीचे योग्य व्यवस्थापन करताना गुंतागुंत टाळण्यास मदत करेल. मधुमेहाच्या संसर्गामुळे अल्सर आणि खालच्या अंगांचे विच्छेदन होण्याचा धोका कमी करणे हे अपोलो डायबेटिक फूट क्लिनिकचे उद्दिष्ट आहे.

डायबेटिक फूट क्लिनिकच्या मल्टिडिसिप्लिनरी टीममध्ये डायबेटोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक आणि व्हॅस्क्युलर सर्जन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, पोडियाट्रिस्ट, पाय आणि शरीराच्या इतर खालच्या अंगांच्या आजारांवर उपचार करणारे विशेषज्ञ, कुशल नर्सेस आणि शारीरिक हालचालींच्या बायोमेकॅनिक्समध्ये निपुण तंत्रज्ञ यांचा समावेश असेल. ज्यात अल्सर नष्ट करणे, संसर्गावर नियंत्रण ठेवणे, नरम उतींमध्ये समतोलाची प्रक्रिया, बोन एक्सोस्टेक्टोमी, किरकोळ विच्छेदन, अक्यूट डिफॉर्मिंग चारकोट सुधारणा, गंभीर विकृती सुधारणे, हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी यांचा उपयोग करून जखमेची अधिक प्रगत पद्धतीने काळजी घेणे आणि दोन टप्प्यांत पुनर्निर्माण यांचा समावेश आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ.संगीता रेड्डी म्हणाल्या, “मधुमेह असलेल्या लोकांना इतर शारीरिक गुंतागुंत आणि संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि पायांचे आजार हा त्यांच्यासाठी अतिशय गंभीर धोका ठरू शकतो. भारतात सध्या, दरवर्षी अशा ४०,००० केसेस होत असून, ही चिंतेची बाब आहे कारण यापैकी बहुतेक व्यक्ती मधुमेही आहेत. मधुमेही फूट आजारावर कोणी एक व्यक्ती सर्व उपचार करू शकत नाही, त्यासाठी विविध तज्ञांच्या समर्पित मल्टिडिसिप्लिनरी टीमची आवश्यकता असते. एका अनुमानानुसार, योग्य काळजी, देखभाल यामुळे जवळपास ८०% केसेसमध्ये अंगविच्छेदन टाळले जाऊ शकते, त्यामुळे मधुमेहींना आपल्या जीवनातील आनंद आणि गुणवत्ता टिकवून ठेवण्यात मदत मिळते. या आजारामध्ये होत असलेली वाढ रोखणे आणि मधुमेहींना विच्छेदनापासून वाचवणे हे अपोलो डायबेटिक फूट क्लिनिकचे उद्दिष्ट आहे.”

अपोलो हॉस्पिटल्सच्या एंडोक्रिनोलॉजी आणि डायबिटीस विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ.आर.एन. मेहरोत्रा म्हणाले, “मधुमेही रूग्णांनी पायांची काळजी घेण्याला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे कारण योग्य उपचार न केल्यास पायाच्या अल्सरचा संसर्ग झपाट्याने होऊ शकतो आणि विच्छेदन करावा लागण्याचा धोका असतो. फोड आणि अल्सर गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचण्याआधी त्यांना प्रतिबंध करणे आणि बरे करणे हे अपोलो डायबिटिक फूट क्लिनिकचे उद्धिष्ट आहे. मल्टिडिसिप्लिनरी टीम असल्यामुळे प्रत्येक रुग्णासाठी योग्य वैयक्तिक उपचार आणि व्यवस्थापन योजनेबाबत सहयोग आणि चर्चा करणे शक्य होते. रुग्णांना त्यांच्या उपचारांसाठी अनेक अपॉईंटमेंट्स घेण्याची गरज उरत नाही, तसेच तज्ञांचे मत मिळवणे आणि त्यांच्याकडून उपचार करून घेण्यात होणारा विलंब टाळता येतो.”ends

Be the first to comment on "अपोलोत ‘डायबेटिक फूट क्लिनिक्स’, डायबेटिक फूट क्लिनिक मधुमेही पायाची लक्षणे ओळखूण मधुमेहावरील उपचाराचे योग्य व्यवस्थापन करेल"

Leave a comment

Your email address will not be published.


*