भूतपूर्व कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीनेच जिंकले वैद्यकीय शिक्षणात सुवर्ण पदक, ग्लोबोकेन रँकिंगमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर १३व्या स्थानावर, भारतात २७,६०५ नवीन केसेसची नोंदणी

नवी मुंबई, २३ सप्टेंबर २०२१ (GNI):– अपोलो इन्स्टिटयूट ऑफ कोलोरेक्टल सर्जरी, चेन्नईमध्ये लो-रेक्टल कॅन्सरसाठी जिच्यावर रोबोटिक कोलोरेक्टल शस्त्रक्रिया केली गेली त्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या २८ वर्षांच्या डॉ जेडीने (गोपनीयतेसाठी नाव बदलण्यात आले आहे) उपचारांनंतर आपले मेडिकल पोस्ट-ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्यामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. योगायोग असा की ही घटना नेमकी अशावेळी घडली जेव्हा अपोलो इन्स्टिटयूट ऑफ कोलोरेक्टल सर्जरीने कोलोरेक्टल आजारांच्या, खासकरून कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सर्वात कमी इन्व्हेसिव्ह रोबोटिक सर्जिकल तंत्र आणि तंत्रज्ञान प्रस्तुत केल्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.

अपोलो इन्स्टिटयूट ऑफ कोलोरेक्टल सर्जरी, चेन्नईचे कन्सल्टन्ट कोलोरेक्टल अँड रोबोटिक सर्जन, डॉ. वेंकटेश मुनिकृष्णन यांनी सांगितले, “डॉ. जेडीला २०१७ मध्ये म्हणजे जेव्हा ती २४ वर्षांची होती तेव्हा लो-रेक्टल कॅन्सर झाला असल्याचे समजले, त्याचवेळी तिच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात होणार होती. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता कारण तिला असे वाटले की उपचार जरी झाले तरी तिचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न मात्र भंग होईल. तिला असे वाटण्यामागचे कारण म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये पारंपरिक शस्त्रक्रियेत रुग्णांमध्ये कोलोस्टोमी राहते, म्हणजे शरीरात शस्त्रक्रियेमार्फत केलेले एक ओपनिंग जे बॉवेल वेस्टला एका बाहेरच्या कोलोस्टोमी बॅगपर्यंत नेऊन पोहोचवते. तिने ही आशा मनात धरून आमच्याशी संपर्क केला की आम्ही तिला असा उपाय देऊ शकू ज्यायोगे ती आपला अभ्यास सुरु ठेऊ शकेल आणि सामान्य जीवन जगू शकेल. रोबोटिक कोलोरेक्टल शस्त्रक्रिया करून आम्ही कॅन्सरला हटवण्यात आणि रेक्टल/अनल कनेक्शनसाठी कोलोनचे पुनर्निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. डॉ. जेडीची तब्येत आश्चर्यकारकरित्या सुधारली, तिने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदक देखील पटकावले.”

गेल्या दोन दशकांमध्ये युवापिढीमध्ये २० ते ४० वर्षे वयोगटात कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.  हा वयाचा तो टप्पा असतो जेव्हा व्यक्ती खूप सक्रिय असते, आपले करियर आणि कुटुंबाची उभारणी करत असते आणि त्यामुळे या वयातील रुग्णांना उपचारांनंतर उत्तम दर्जाचे जीवन जगायला मिळणे खूप आवश्यक असते.  जर कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ओळखू आला तर तर तो पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो आणि रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरी रुग्णांना कोलोस्टॉमीशिवाय सर्वसामान्य जीवन जगण्यात मदत करते.

जगभरात कोलोरेक्टल कॅन्सर एक सर्वसामान्य कॅन्सर आहे, पण भारतात याच्या रिपोर्टेड केसेस कमी आहेत.  ग्लोबोकेन २०१८ रँकिंगमध्ये केसेसच्या संख्येनुसार कोलन कॅन्सर १३व्या स्थानावर असून दरवर्षी याच्या २७,६०५ नवीन केसेस येतात आणि दरवर्षी या आजाराने १९,५४८ व्यक्ती आपले प्राण गमावतात. २०१८ पासून संपूर्ण भारतात २७,६०५ नवीन केसेस नोंदवल्या गेल्या आणि भारतात या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास ५३,७०० असेल असे अनुमान आहे. कोलोरेक्टल कॅन्सर वाढत आहे, खासकरून आशिया खंडातील युवा पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे आणि याचे एक प्रमुख कारण त्यांची बिघडलेली जीवनशैली हे आहे.ends

Be the first to comment on "भूतपूर्व कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीनेच जिंकले वैद्यकीय शिक्षणात सुवर्ण पदक, ग्लोबोकेन रँकिंगमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर १३व्या स्थानावर, भारतात २७,६०५ नवीन केसेसची नोंदणी"

Leave a comment

Your email address will not be published.


*