‘मेडिकाबाजार’ एआय-एमएल स्वरुपाच्या ‘विझी’ ला पेटंट बहाल, रुग्णालयांमधील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ ची यंत्रणा व कार्यपद्धती यासाठी पेटंटची मंजुरी

मुंबई, १७ जून २०२१ (GNI): वैद्यकीय वस्तू, औषध उत्पादने आणि वैद्यकीय उपकरणे यांच्या पुरवठ्याच्या क्षेत्रात भारतात अव्वल क्रमांकावर असलेल्या ‘मेडिकाबाजार’ या बी-२-बी प्लॅटफॉर्मच्या ‘विझी’ या एआय-एमएल (आर्टीफिशीअल इंटेलिजन्स-मशीन लर्निंग) आधारीत व रुग्णालयांतील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट व फोरकास्टिंग’ यांविषयीच्या सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनला राष्ट्रीय पेटंट मंजूर झाले आहे. रुग्णालयांमधील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ची यंत्रणा व कार्यपद्धती याकरीता हे पेटंट ‘विझी’ ला देण्यात आले आहे. ‘मेडिकाबाजार’ तर्फे आज ही माहिती देण्यात आली. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या संधी ओळखण्यात ‘मेडिकाबाजार’ ला मिळणारे यश आणि या संधी आरोग्यसेवा क्षेत्रातील संस्थांना मिळवून देण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान सादर करण्याचे ‘मेडिकाबाजार’ चे सामर्थ्य यांचे हे पेटंट एक प्रमाण आहे. ‘मेडिकाबाजार’ ने ‘पेटंट कोऑपरेशन ट्रिटी’ अंतर्गत (पीसीटी) आंतरराष्ट्रीय पेटंटचादेखील अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये ‘विझी’ ला पेटंट संरक्षण मिळेल. त्याचबरोबर, ६१ हून अधिक देशांमध्ये पेटंट वापरण्यास मेडिकाबाजार सक्षम असेल आणि या देशांमधील ग्राहकांसाठी आपले उत्पादन ती बाजारपेठेत आणू शकेल.

‘मेडिकाबाजार’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक तिवारी म्हणाले, “रुग्णालयांतील महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्यांना स्मार्ट निर्णय घेण्याकरीता सक्षम करण्यासाठी ‘एआय-एमएल’ वर आधारलेल्या ‘विझी’च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला भारतात पेटंट मंजूर झाले, याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. आणखी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्जही केला आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते योग्य वेळी निश्चितपणे मिळेल. त्यातून आम्हाला जगभरातील ग्राहकांना आमची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सोल्यूशन्स वितरीत करण्यास अनुमती मिळेल. पेटंट मिळाल्यामुळे ‘एआय’च्या अनुप्रयोगांमध्ये यापुढेही संशोधन करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे. आरोग्यसेवा उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या वापराकरीता साधने विकसीत करण्यासाठी उत्पादने आणि नवीन डोमेन यांच्यावर हे संशोधन करण्याचा आमचा मानस आहे.”

‘विझी’ हे अॅप्लिकेशन २०१९ मध्ये सादर करण्यात आले. रुग्णालयांना सामग्रीच्या खरेदीचे नियोजन करताना मदत व्हावी, या दृष्टीने ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ मध्ये परिवर्तन घडविण्याचे काम ‘विझी’ ने केले आहे. वस्तूंची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राखीव साठा बाळगण्याकरीता उत्पादनांची एक कृतिशील खरेदीची यादी ‘विझी’ मधून पुरविली जाते. राखीव साठा कायम उपलब्ध राहावा यासाठी त्याची पातळी रंगीत निदर्शकाने दर्शविली जाते. हे अॅप्लिकेशन वापरताना रुग्णालयांना डेटा एन्ट्री करण्याचे अतिरिक्त काम करावे लागत नाही. अनेक स्रोतांकडून विविध वस्तू व उत्पादने घेण्याचे त्रासदायक व अनावश्यक काम करण्याऐवजी ‘मेडिकाबाजार’ या एकाच स्रोताकडून रास्त किंमतींमध्ये खरेदी करता येईल, अशी सुविधा ‘विझी’ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आपल्या आरोग्यसेवा संस्था व रुग्णालयांमध्ये ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ योग्य प्रमाणात होत असल्याबद्दल, तसेच खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढल्याबद्दल भारतातील अनेक ग्राहकांनी ‘विझी’च्या योगदानाचे कौतुक केले आहे.ends

Be the first to comment on "‘मेडिकाबाजार’ एआय-एमएल स्वरुपाच्या ‘विझी’ ला पेटंट बहाल, रुग्णालयांमधील ‘इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ ची यंत्रणा व कार्यपद्धती यासाठी पेटंटची मंजुरी"

Leave a comment

Your email address will not be published.


*