अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने १० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला, सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात २०० लाख लसीकरण पूर्ण केले जाईल

नवी मुंबई, ३० मे २०२१ (GNI):- अपोलो हॉस्पिटल्सने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुढाकार घेत थेट कोविशील्ड व कोवॅक्सीन लस उत्पादकांकडून लशी मिळवण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने ३ मे २०२१ पासून १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणास सुरुवात केली आहे.

अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्षा श्रीमती शोभना कामिनेनी यांनी सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने भारतात ८० ठिकाणी १० लाख लसी पूर्ण केल्या आहेत. आम्ही लसीकरणामध्ये देशभरातील फ्रंटलाईन कर्मचारी, अधिक धोका असलेल्या व्यक्ती आणि कॉर्पोरेट कर्मचारी यांना प्राधान्य दिले. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी वॅक्सीनेटर म्हणून आम्ही या लढाईमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करणे यापुढे देखील सुरु ठेवू. आमच्या इम्युनायजेशन प्रोग्रामला आम्ही असेच पुढे वाढवत राहणार आहोत.  पहिल्या १० लाख लसी पूर्ण करण्यासाठी आम्हाला ३ आठवडे लागले, जून महिन्यात आम्ही दर आठवड्याला १० लाख लसीकरणे पूर्ण करू आणि जुलै महिन्यात ही संख्या दुप्पट केली जाईल. सप्टेंबर २०२१ पर्यंत २०० लाख लसी पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही योग्य मार्गावर पुढे जात आहोत. केंद्र व राज्य सरकार, तसेच कोविशील्ड व कोवॅक्सीन उत्पादकांकडून आम्हाला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. भारतात मंजुरी देण्यात आलेली तिसरी लस स्पुटनिक जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अपोलो सिस्टीममार्फत उपलब्ध होईल. आम्ही असे मानतो की, जोपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण होत नाही तोवर कोणीही सुरक्षित नाही.”

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड श्री संतोष मराठे यांनी सांगितले, “सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर कोविड-१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड लसीकरण सुरु करणाऱ्या, देशातील पहिल्या खाजगी रुग्णालयांपैकी अपोलो हॉस्पिटल्स एक आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जाईल अशी केंद्रे निर्माण करण्यासाठी आणि ती सुरळीतपणे चालवता यावीत यासाठी आम्ही सक्षम संसाधने, शीत शृंखला व्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच विविध संसाधने तैनात केली आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिसरातील तसेच हौसिंग सोसायट्यांमधील लसीकरण अभियानांबरोबरीनेच खारघर (सरस्वती इंजिनियरिंग कॉलेज) आणि वाशी (मॉडर्न स्कूल) येथे २ कम्युनिटी व्हॅक्सिनेशन्स सेंटर्स उभारण्यासाठी आम्हाला सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनुमती मिळाली आहे. ३ मेपासून आम्ही दररोज जवळपास १००० व्यक्तींना लस देत आहोत. आमच्या सर्व सुसज्ज संसाधनांसह आमचे तज्ञ व वैद्यकीय कर्मचारी हा उपक्रम असाच पुढे सुरु ठेवण्यासाठी सज्ज आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा या उपक्रमाचा प्रसार करत असतानाच सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर देखील आम्ही भर देत आहोत.” Ends

Be the first to comment on "अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने १० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला, सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात २०० लाख लसीकरण पूर्ण केले जाईल"

Leave a comment

Your email address will not be published.


*