मुंबई, २६ एप्रिल २०२१ (GNI): अपग्रॅड या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या ऑनलाईन उच्च शिक्षण कंपनीने टेमसेक या सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या जागतिक गुंतवणूकदार कंपनीकडून १२० मिलियन यूएस डॉलर्सची भांडवल उभारणी केली असल्याची घोषणा आज करण्यात आली. शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अपग्रॅडने बाहेरून भांडवल उभारणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अपग्रॅडची स्थापना २०१५ साली करण्यात आली, तेव्हापासून या कंपनीची १००% मालकी, संचालन तिच्या सह-संस्थापकांकडे आहे, एक भांडवल-सक्षम व्यवसाय असलेल्या या कंपनीला सर्व भांडवल देखील आजवर तिच्या सह-संस्थापकांकडूनच पुरवले जात होते.
या नव्या भांडवलाचा उपयोग अपग्रॅड आपली टीम अधिक जास्त मजबूत करण्यासाठी, जागतिक बाजारपेठांमधील आपल्या संचालनामध्ये वाढ करण्यासाठी, तंत्रज्ञान व उत्पादन क्षमतांना आधारबळ देण्यासाठी, विलीनीकरण व अधिग्रहण संधींचा लाभ घेण्यासाठी, भारतातील पदवी व पदव्युत्तर पदव्यांच्या पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासाठी आणि २०२६ पर्यंत २ बिलियन यूएस डॉलर्स महसूल मिळवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संचालनात वाढ करण्यासाठी करणार आहे. अशाप्रकारे भारतातील उच्च शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी हे स्थान अपग्रॅड अधिक जास्त बळकट करणार आहे. क्रेडिट स्वीईस यांनी अपग्रॅडचे विशेष आर्थिक सल्लागार म्हणून तर राजाराम लीगल यांनी कायदा सल्लागार म्हणून काम पाहिले.
अपग्रॅडचे सह-संस्थापक श्री. रॉनी स्क्र्यूवाला, श्री. मयांक कुमार आणि श्री. फाल्गुन कोमपल्ली यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “जागतिक मनुष्यबळापैकी प्रत्येक व्यक्तीला करियरमध्ये यश मिळवता यावे यासाठी त्यांचे आयुष्यभर चालणारे शिक्षण पुरवणारे विश्वसनीय भागीदार या नात्याने सक्षम करण्याच्या आणि करियरमध्ये अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणण्याच्या आमच्या उद्धिष्टामध्ये आमचे सहयोगी म्हणून टेमसेकचे स्वागत आहे. भारत ही जगाची अध्यापन राजधानी बनावी हे लक्ष्य समोर ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत, अशावेळी या भांडवलामुळे जागतिक पातळीवर आणि भारतात जास्तीत जास्त भागांमध्ये विस्तार करण्याच्या आमच्या संकल्पाला बळ मिळेल.” Ends
Be the first to comment on "अपग्रॅडने ‘टेमसेक’ कडून उभारले १२० मिलियन यूएस डॉलर्स शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी तसेच पदव्युत्तर पदव्यांच्या पोर्टफोलियोचा विस्तार करण्यासाठी भांडवलाचा उपयोग होईल"