~खंडाळा सार्वजनिक आरोग्य केंद्रांना कोविड-१९ लसी सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष गोदरेज वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स देण्यात आले आहेत.
खंडाळ्याचे माननीय तहसीलदार श्री दशरथ काळे आणि तालुका आरोग्य अधिकारी-खंडाळा डॉ. अविनाश पाटील यांच्यासह प्लांट प्रमुख – शिरवळ, गोदरेज अप्लायन्सेस श्री सुनील बेलोसे, प्लांट प्रमुख – लॉकीम मोटर्स श्री अभय पेंडसे आणि इतर गोदरेज प्रतिनिधी
पुणे, 18 एप्रिल, २०२१ (GNI): गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या, भारतातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक गोदरेज अप्लायन्सेस या गोदरेज बॉयसच्या बिझनेस युनिटने प्रत्येकी २२५ लिटर क्षमतेचे ४ विशेष वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स खंडाळा येथील तीन सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि एका ग्रामीण रुग्णालयाला मदत म्हणून पुरवले आहेत. या आरोग्य केंद्रांना व रुग्णालयाला कोविड लसीकरण अभियान राबवण्यासाठीची आपली तयारी अधिक मजबूत करता यावी या उद्देशाने गोदरेज अप्लायन्सेसने त्यांना ही मदत पुरवली आहे.
लसी आणि जीवनरक्षक वस्तूंसाठी भारतात बनवलेल्या, अत्याधुनिक शीत साठा सुविधांसह गोदरेज भारत सरकारच्या, सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण अभियानामध्ये सहयोग देत आहे.
एका औपचारिक समारंभामध्ये हे चार वॅक्सीन रेफ्रिजरेटर्स सार्वजनिक आरोग्यकेंद्रांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले. खंडाळ्याचे माननीय तहसीलदार श्री. दशरथ काळे यांनी यावेळी उपस्थित राहून ही युनिट्स खंडाळ्याच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांना सुपूर्द केली. यावेळी गोदरेजच्या इतर प्रतिनिधींबरोबरीनेच गोदरेज अप्लायन्सेसच्या शिरवळ प्लांटचे प्रमुख श्री. सुनील बेलोसे हे देखील उपस्थित होते.
गोदरेज अँड बॉयसच्या कोविड आउटरीच उपक्रमातर्गत कंपनीने हे पाऊल उचलले आहे. गोदरेज अप्लायन्सेस, गोदरेज लॉकीम मोटर्स आणि गोदरेज इंटेरिओ हे वेगवेगळे विभाग यामध्ये सहभागी आहेत. विविध उद्योगक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांचा समावेश असलेल्या गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस ही राष्ट्र निर्माण आणि समाजहिताच्या जबाबदारीबद्दलच्या वचनबद्धतेसाठी नावाजली जाते.
This thought extends from human-centric design to planet centric design. Environment is a core value at Godrej Appliances. Both manufacturing units of Godrej Appliances’ – in Maharashtra and Punjab, became the first in the country to win the coveted Platinum Plus Green Co certification for their pioneering green manufacturing practices.
The brand takes pride in not just its carefully designed products and environment-friendly technologies, but also best in class after-sales service delivered through over 680 service centers and more than 4500 SmartBuddy service experts spread all over the country. Godrej customers can now book or track service requests on WhatsApp (9321665511), besides the toll-free 1800 209 5511. To learn more visit : https://www.godrej.com/godrej-appliances
Be the first to comment on "गोदरेजने कोविड-१९ लसी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय रेफ्रिजरेटर्स मदत म्हणून पुरवले"