Indegene Limited raises ₹548.77 crore from 36 anchor investors at the upper price band of ₹452 per equity share - CtrlS Noida Datacenter Turns to Solar for 60% of its Power Requirement, Aims to reduce 94,640 tonnes of CO2 emissions through this move - TBO TEK LIMITED ANNOUNCED IT'S INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPENS ON 08th May, 2024 Sets Price Band fixed at ₹ 875 to ₹ 920 per equity share of face value of ₹ 1 each - Afternoon Voice Hosts 16th Newsmakers Achievers Award 2024, Recognising Outstanding Contributions Across Various Fields - AADHAR HOUSING FINANCE LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) OF EQUITY SHARES OPENS ON MAY 8, 2024 Sets Price Band fixed at ₹ 300 to ₹ 315 per equity share of face value of ₹ 10 each - Sankalp Art Fest Presents An Art Exhibition will be held @ Namah Royal Banquet Hall at Borivali (W) in Mumbai - Collaborates with the Akshaya Patra Foundation for Sustainable Growth in India - Kokilaben Hospital launches Arthrex Modular Glenoid System with VIP for Enhanced Shoulder Replacement for the First Time in India - उत्तर मुंबई मतदार संघातील पीयूष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल, जल्लोषात समर्थन देत भाजप - महायुती कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन - "Every Picture has a story" An exhibition of Photographs will be displayed by Kabeer Ramesh @ Nitya Artists Centre at Prabhadevi, Mumbai

कोरोनावर मात केलेल्या चार रुग्णांना मिळाले नवे यकृत अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई, २६ फेब्रुवारी २०२१: नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये कोरोना या आजारातून बऱ्या झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. या चारही रुग्णांना यकृताचा शेवटच्या टप्प्यातील आजार असल्याचे निदान झाले होते. तीन रुग्णांमध्ये प्रत्यारोपण झालेली यकृते ही हयात असलेल्या दात्यांकडून मिळविण्यात आली, तर एका रुग्णामध्ये प्रत्यारोपित झालेले यकृत हे एका मृत दात्याचे होते. यकृत प्रत्यारोपण झालेले हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत व त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. १४ महिन्यांत यकृत प्रत्यारोपणाच्या २९ मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या ४२ हृदय प्रत्यारोपणाच्या २ शस्त्रक्रिया अपोलोने रुग्णालयाने यशस्वी केल्या.

३७ वर्षीय सागर गडकरी, मागील ८ महिन्यांपासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होता. बिघडलेल्या यकृतामुळे त्याला वारंवार जलोदर आणि रक्ताच्या उलट्या यांचा त्रास होत होता. त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे त्याचे प्रकरण अधिक आव्हानात्मक बनले. कोरोना साथीपासून बचावाकरीता घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे खबरदारी घेत, नवी मुंबईतील अपोलो मधील यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर यशस्वीरित्या केली. क्रोनिक यकृत रोगाने ग्रस्त असलेला ६४ वर्षीय विष्णु चव्हाणची, ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पॉझिटिव्ह आली. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे, जिवंत-संबंधित दाता यकृत प्रत्यारोपणासाठी अयोग्य दाता मिळण्यासारख्या अनेक गुंतागुंतीच्या घटना उद्भवल्या. शल्यक्रिया होण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणी घेऊन अवयवदात्याच्या यकृताचे आवश्यक ते मूल्यांकन करण्यात आले आणि रुग्णावर यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाले. आता हा रुग्ण स्वस्थ आहे. याचप्रमाणे तन्वी पालांडे १९ वर्षीय ठाणे, येथील तरुणी हिच्यावर देखील लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करण्यात आले. 

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हेपेटोलॉजी (अ‍ॅडल्ट एंड पॅडियाट्रिक्स) या विभागाच्या कन्सल्टंट डॉ. आभा नगराल म्हणाल्या, कोरोना मधून बरे झाल्यानंतरदेखील यकृत खराब असलेल्या स्थितीतील रूग्णांवर उपचार करताना प्रचंड आव्हानांचा सामना करावा लागतो, कारण या रूग्णांमध्ये जंतूसंसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. आपत्कालीन परिस्थिती असूनही, यकृत प्रत्यारोपणाची क्रिया सुरू ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठीची रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी कमी करणे आणि मृत्यूदर घटविणे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही केसेसमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व यकृताचा अखेरच्या टप्प्यातील आजार असलेल्या रुग्णांना विषाणू-संसर्ग होऊ नये म्हणून अतिकाळजी घेण्यात आली. प्रोटोकॉल पाळून, आम्ही जीवन वाचविण्यासाठी नेटाने उपचार केले आणि कोरोना पासून बरे झालेल्या चार रुग्णांवर यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.”

नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड व सीओओ संतोष मराठे यांनी नमूद केले, “गेल्या अनेक वर्षांत आमच्या संस्थेने प्रत्यारोपणाच्या असंख्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, हे वर्ष मोठेच आव्हानात्मक ठरले. त्यातच, यकृताचा जुनाट आजार असलेल्या रुग्णांमध्ये गुंतागुंत झाल्याच्या घटना देशभर पाहावयास मिळाल्या. अशा परिस्थितीत, सर्व आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियंत्रण प्रोटोकॉलचे अनुसरण करून, आम्ही प्रत्यारोपणासारखे उपचार सुरू ठेवले, कारण यातील बहुतांश रुग्णांचे अवयव अखेरच्या टप्प्यापर्यंत निकामी झाले होते. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांसह भागीदारीही केली आहे; जेणेकरून लोकांना प्रगत क्लिनिकल तज्ञ सेवा मिळू शकेल.”

अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. विक्रम राऊत म्हणाले, “यकृताची गंभीर स्थिती असलेल्या चार रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक होते. आमच्याकडे आलेल्या या केसेस अतिशय गुंतागुंतीच्या होत्या. त्यातच या रुग्णांना कोरोनाची लागण झालेली होती; तथापि, कोरोनाच्या अनिवार्य खबरदारीचे पालन करून आणि कोविडच्या चाचण्यांचे निगेटिव्ह अहवाल प्राप्त करून आम्ही सर्व रूग्णांवर यकृताचे प्रत्यारोपण केले. या रूग्णांपैकी एकाला कोरोना पासून बरे झाल्यानंतर मृत व्यक्तीकडून अवयवदान घ्यावे लागले. अशा प्रकारे पश्चिम भारतातील कोविडपश्चात ‘डीडीएलटी’ची (डीसीज्ड डोनर लिव्हर ट्रान्सप्लॅंट) ही पहिली केस ठरली. रुग्णाला कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून शस्त्रक्रियेदरम्यान व नंतरही त्याची अति काळजी घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरचे जंतूसंसर्ग प्रतिबंधक उपायांचा कठोरपणे अवलंब करून आणि विलगीकरणाचे प्रोटोकॉल व ‘इम्युनोसप्रेशन’ चे व्यवस्थापन करून आम्ही कोरोना साथीच्या काळातही यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू शकतो याचे एक उदाहरण घालून दिले.”ends

Be the first to comment on "कोरोनावर मात केलेल्या चार रुग्णांना मिळाले नवे यकृत अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश"

Leave a comment

Your email address will not be published.


*