Rays Power Infra announced closure of INR 127 Crore Equity Capital Fund Raise - "Mother's Embrace" A Photography Exhibition will be displayed by Renowned Photographer Devendra Naik at Jehangir Art Gallery in Mumbai - DAM Capital Advisors collects Rs 251 cr from Anchor Investors - Blackstone backed Ventive Hospitality Limited raises ₹ 719.55 Crores from 26 anchor investors at the upper end of the price band at ₹643 per equity share - The Inventurus Knowledge Solutions Limited listing ceremony held at NSE today - “ENCOUNTER WITH THE MOMENT” An Exhibition of Photographs by Gurdeep Dhiman at Jehangir Art Gallery in Mumbai - VENTIVE HOSPITALITY LIMITED ANNOUNCED ITS Rs. 16,000 MILLION INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON FRIDAY, DECEMBER 20, 2024 Sets Price Band fixed at Rs. 610 to Rs. 643 per equity share of face value of Rs. 1 each - Dr Agarwals Eye Hospital, Chembur, launches advanced laser system for precise and bladeless corneal surgery, Renowned actress Saiee Manjrekar inaugurates the state-of-the-art WaveLight FS200 Femtosecond Laser System - DAM Capital Advisors Limited announced its initial public offering (IPO) to open on Thursday, December 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 269/- per equity share to ₹ 283/- per equity share of the face value of ₹2 each - TRANSRAIL LIGHTING LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY, DECEMBER 19, 2024 Sets Price Band has been fixed at ₹ 410.00 to ₹ 432.00 per equity share, of face value ₹2 each - CONCORD ENVIRO SYSTEMS LIMITED ANNOUNCED ITS INITIAL PUBLIC OFFERING (IPO) TO OPEN ON THURSDAY DECEMBER 19, 2024 Sets Price Band fixed at ₹ 665 to ₹ 701 per equity share of face value of ₹5 each

अपोलो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील

नवी मुंबई, १६ जानेवारी २०२१ (GNI):- अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगालसीकरण मोहिमेचा शुभारंभने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. लसींची पहिली खेप पोहोचली असल्याने आज शहरात कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे. अपोलो रुग्णालय नवी मुंबई येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील.  सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. साधारण २-४ आठवड्यांनंतर किंवा निर्देश देण्यात आल्याप्रमाणे याच आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस दिला जाईल.  लसींची दुसरी खेप पोहोचली की अजून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. अपोलो हॉस्पिटल्समध्ये कोरोनाची पहिली लस श्री. वेंकटराम व्ही या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्याला देण्यात आली. 

नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री. अभिजित बांगर यांनी सांगितले, “नवी मुंबईमध्ये निवडण्यात आलेली सेंटर्स व विशेष प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मार्फत कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ होत आहे हे घोषित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील आणि कोविड-१९ विरोधातील युद्धात आघाडीवर राहून लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. सुरुवातीला साधारणपणे ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना निर्देशित मार्गदर्शक सूचनांनुसार लस दिली जाईल.” 

लसीकरण अभियानासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे हे देखील आज नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटल्समध्ये उपस्थित होते. 

अपोलो हॉस्पिटल्स आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहयोगाबद्दल अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे युनिट हेड व सीओओ श्री. संतोष मराठे यांनी सांगितले, “अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे कोविड-१९ लसीकरणासाठी नियुक्त करण्यात आलेले पहिले खाजगी रुग्णालय आहे, याठिकाणी ४ लसीकरण बूथ आहेत.  अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे नवी मुंबईतील लोकांसाठी लसीकरणाची मोहीम सर्वतोपरी यशस्वी व्हावी आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने ही मोहीम सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सोयीसुविधांनी सज्ज आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेसोबत हा उपक्रम हाती घेणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.”ends

Be the first to comment on "अपोलो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, सुरुवातीला जवळपास ९५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दररोज जवळपास १०० लसी दिल्या जातील"

Leave a comment

Your email address will not be published.


*