लाव्हाने दाखल केला MyZ हा कस्टमाइज्ड करता येणारा पहिलावहिला फोन खरेदी केल्यावरही ग्राहकांना त्यातील वैशिष्ट्ये अपग्रेड करणे शक्य

Mumbai, 7th जानेवारी 2021 (GNI): MyZ, दाखल केल्यामुळे, #प्राउडलीइंडियन लाव्हा ही कस्टमाइज करता येईल असा जगातील पहिला स्मार्टफोन दाखल करणारी पहिली कंपनी ठरली आहे. स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना तो कस्टमाइज करता येईल (MyZ च्या स्वरूपामध्ये) आणि खरेदीनंतरही कस्टमाइज करता येईल (Zup च्या स्वरूपामध्ये) असे लाव्हाने एका शानदार कार्यक्रमामध्ये जाहीर केले आहे. लाव्हा स्मार्टफोन आता RAM, ROM, फ्रंट कॅमेरा, रिअर कॅमेरा व फोनचा रंग यांचे निरनिराळे पर्याय वापरून 66 पद्धतींनी कस्टमाइज करता येऊ शकतात.

स्मार्टफोन उद्योगामध्ये मोठे परिवर्तन साध्य करत, लाव्हाने स्मार्टफोनसाठी ‘मेड ऑन डिमांड’ ही नवी संकल्पना जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांना 2GB, 3GB, 4GB किंवा 6GB RAM यातून पर्याय निवडता येऊ शकतो व त्याची सांगड 32GB, 64GB व 128GB ROM यांच्याशी घालता येऊ शकते. तसेच, त्यांना ड्युएल (13+2MP) किंवा ट्रिपल रिअर कॅमेरा (13+5+2MP), 8MP किंवा 16MP सेल्फी कॅमेरा यातून योग्य पर्याय निवडता येऊ शकतो. अखेरीस, ग्राहकांना त्यांच्या आवडीचा रंग ठरवता येईल आणि लाव्हाच्या Z सीरिजमधला MyZ पूर्णपणे तयार करता येईल. आपल्या आवडीप्रमाणे तयार केलेला हा फोन ग्राहकांना लाव्हा इ-स्टोअर – www.lavamobiles.com येथून मागवता येईल आणि ग्राहकांनी तयार केलेला खास फोन त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल.

MyZ व Zup सीरिजमध्ये मीडियाटेक हेलिओ G35 ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे आणि ब्लोटवेअरमुक्त पूर्णतः अँड्रॉइड सेवा मिळावी, यासाठी त्यामध्ये स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस आहे. हार्डवेअरच्या बाबतीत, फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच, display of 6.5” (16.55 cm) HD+ डिस्प्ले व त्यास कोर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण असेल. फोनमध्ये 5,000 mAH या मोठ्या बॅटरीचा समावेश असल्याने दिवसभर सहजपणे फोन वापरता येईल. तसेच त्यामध्ये टाइप-C चार्जिंग पोर्ट आहे. हे सर्व फोन दणकटपणाच्या बाबतीत मिलिटरी ग्रेड प्रमाणित आहेत.

“भारतातील संशोधन व विकास आणि डिझाइन टीममधील तरुणांनी साकार केलेल्या उत्तम डिझाइनची घोषणा करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. यामुळे लाव्हा ही असा मैलाचा टप्पा साध्य करणारी जगातील पहिलीवहिली कंपनी ठरली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेमुळे लाव्हा ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारच आहे, शिवाय अपस्ट्रीम व डाउन-स्ट्रीम सप्लाय चेनच्या बाबतीतही अतिशय कार्यक्षम व तत्पर कंपनी ठरणार आहे. लवकरच, रिटेलर व ट्रेड यांनाही त्यांच्या ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे फोन तयार करून देता येणार आहेत”, असे लाव्हा इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट व बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितले.

कस्टमाइज करण्याची सुविधा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. लाव्हाने ग्राहकांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सोडवला आहे. फोन वापरण्याच्या ग्राहकांच्या सवयी बदलत असून, त्यांना उच्च RAM/ROM असणारा फोन हवा आहे. परंतु, अशा वेळी त्यांना अधिक वैशिष्ट्ये असणाका नवा फोन घेण्याशिवाय आणि संपूर्ण पैसे मोजण्याशिवाय अन्य पर्याय उरत नाही.

परंतु, लाव्हाच्या Zup मुळे ग्राहकांना फोन खरेदी केल्यापासूनच्या पहिल्या वर्षात तो अपग्रेड करता येऊ शकतो. त्यासाठी त्यांना लाव्हा सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. तातडीने अपग्रेड करून घ्यायचे असेल तर ग्राहकांनी जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये वेळ निश्चित करून घ्यावी. अपग्रेड केलेल्या बाबींपुरते वाढीव पैसे देऊन फोन अपग्रेड करणे शक्य आहे.

“आम्ही ही निरनिराळी नावीन्यपूर्ण सेवा सादर करून, आपल्या पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया हे स्वप्न चोखपणे प्रत्यक्षात साकारले आहे. पर्यावरणाची सुरक्षा आणि ई-वेस्टपासून संरक्षण या दृष्टीनेही ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे,” असे सुनील रैना यांनी नमूद केले.

लाव्हाने Z6 हा 6+64GB स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा (13+5+2MP) आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

यानंतर लाव्हा Z4 हा 4+64GB स्मार्टफोन सादर करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा (13+5+2MP) आणि या श्रेणीतील पहिला 16MP सेल्फी कॅमेरा असेल. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे.

लाव्हाने Z2 हा 2GB RAM व 32GB स्टोअरेज असणारा फोन सादर केला आहे. फोनमध्ये 13+2 MP ड्युएल कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनची किंमत 6,999 रुपये आहे.

Z2, Z4 आणि Z6 यामध्ये मीडियाटेक हेलिओ G35 ऑक्टा कोअर प्रोसेसर असणार आहे आणि ब्लोटवेअरमुक्त पूर्णतः अँड्रॉइड सेवा मिळावी, यासाठी त्यामध्ये स्टॉक अँड्रॉइड 10 युजर इंटरफेस असेल. हार्डवेअरच्या बाबतीत, फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच, display of 6.5” (16.55 cm) HD+ डिस्प्ले व त्यास कोर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण असेल. फोनमध्ये 5,000 mAH या मोठ्या बॅटरीचा समावेश असल्याने दिवसभर सहजपणे फोन वापरता येईल. तसेच त्यामध्ये टाइप-C चार्जिंग पोर्ट आहे. हे सर्व फोन दणकटपणाच्या बाबतीत मिलिटरी ग्रेड प्रमाणित आहेत.

Lava has also unveiled the FIRST DESIGNED IN INDIA SMARTPHONE, Lava Z1 – a 100% indigenous phone, designed by Indian engineers. This 2+32GB phone offers a hang free, durable product experience to upgrade feature phone users to smartphones. आवाजाची गुणवत्ता दर्जेदार असावी, यासाठी फोनमध्ये 5 मॅग्नेट स्पीकर आहे. लाव्हा Z1 ची किंमत 5,499 रुपये आहे. कोर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण असलेला आणि दणकटपणाच्या बाबतीत मिलिटरी ग्रेड प्रमाणित असलेला हा या श्रेणीतील पहिला फोन आहे.

लाव्हाने पहिली स्मार्टबँडही दाखल केला आहे – BeFIT. या बँडमुळे ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन उपक्रमांचा मागोवा घेता येईल, शरीराचे तापमान, हार्ट रेट व ऑक्सिजनची पातळी यावर देखरेख ठेवता येईल, तसेच ईमेल, कॉल घेता येतील. BeFIT ची किंमत 2,699 रुपये असेल.

MyZ आणि Z2, Z4 व Z6 हे 11 जानेवारी 2021 पासून सर्व ऑफलाइन व ऑनलाइन पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

Zup आणि Z1 व BeFIT हे 26 जानेवारी 2021 पासून सर्व ऑफलाइन व ऑनलाइन पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेडविषयी

प्राउडलीइंडियन

वुई मेक इन इंडिया, वुई मेक फॉर इंडिया

लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेड ही आघाडीची भारतीय मोबाइल हँडसेट कंपनी असून ती 20 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. कंपनीची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झपाट्याने वाढते आहे. कंपनी कार्यरत असलेल्या देशांपैकी अनेक देशांमध्ये कंपनीने तेथील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमामध्येही लाव्हा अग्रेसर आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय अभियानामध्ये योगदान देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांमध्ये लाव्हा हा पहिला मोबाइल ब्रँड होता. कंपनीने भारतात डिझाइन टीम निर्माण केली आणि देशात फोन डिझाइन करणारी पहिली कंपनी हा मान मिळवला. या ‘डिझाइन इन इंडिया’ उपक्रमामुळे, खऱ्या अर्थाने ‘मेड इन इंडिया’ फोन तयार करणारी आणि देशामध्ये डिझाइन व उत्पादन यावर संपूर्ण नियंत्रण असणारी लाव्हा ही एकमेव मोबाइल हँडसेट कंपनी ठरली आहे.

“लोकांना अधिकाधिक काम करण्यास, यश मिळवण्यास सक्षम करणे” या उद्देशाने 2009 मध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली. लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेडचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे. नोएडा येथे अंदाजे 300,000 चौरस फूट क्षेत्रामध्ये कंपनीचा स्वतःचा उत्पादन प्रकल्प आणि दुरुस्ती कारखाना आहे. उत्पादन प्रकल्पाची क्षमता वार्षिक 40 दशलक्ष फोन निर्माण करण्याची आहे. Ends

Be the first to comment on "लाव्हाने दाखल केला MyZ हा कस्टमाइज्ड करता येणारा पहिलावहिला फोन खरेदी केल्यावरही ग्राहकांना त्यातील वैशिष्ट्ये अपग्रेड करणे शक्य"

Leave a comment

Your email address will not be published.


*