ड्रीम११ आयपीएलसोबत सलग तिसऱ्या वर्षी सहप्रायोजक असल्याचे टाटा मोटर्सकडून जाहीर, टाटाची अल्ट्रोझ गाडी आहे या क्रिकेट स्पर्धेची अधिकृत पार्टनर

मुंबई, १४ सप्टेंबर २०२० (GNI): भारताचा अग्रेसर ऑटोमोटिव्ह ब्रँड टाटा मोटर्सने आपली प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ ही कार ड्रीम११ इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२० ची अधिकृत पार्टनर असल्याची घोषणा केली. आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून ५० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सामने संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) दुबई, अबुधाबी व शारजा इथे होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) सलग तिसऱ्या वर्षी संलग्नता सुरू ठेवत अल्ट्रोझ ही गाडी या आधीच्या नेक्सॉन व हॅरियर या गाड्यांच्या पदचिन्हांवरच मार्गक्रमण करत आहे. २०१८ मध्ये नेक्सॉन तर २०१९ मध्ये हॅरियर ही गाडी आयपीएलची अधिकृत पार्टनर होती.

या कराराबाबत टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहतूक वाहन व्यवसाय मार्केटिंग विभागाचे (पीव्हीबीयू) प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्हणाले, ‘’आता सुरू झालेला सणासुदीचा काळ आमच्यासाठी चांगला ठरत आहे आणि भारतातील क्रिकेट रसिकांसाठी आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही एका उत्सवापेक्षा कमी महत्त्वाची नाही. आयपीएलशी सलग तिसऱ्या वर्षी जोडले गेल्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि या वेळी आम्ही अशी कार घेऊन आलो आहोत जिने सर्वच वर्तुळांत सोन्यासारखी कामगिरी केली आहे- टाटा अल्ट्रोझ. अल्ट्रोझ जशी ती चालवणाऱ्यांसाठी सुरक्षित आहे तसेच या वर्षी सुरक्षित व सॅनिटाइज्ड वातावरणात खेळवली जाणार असून, सद्यस्थितीत प्रत्येक खेळाडूच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाणार आहे. टाटा मोटर्समध्ये आम्ही नेहमी नवनव्या प्रकारांना ग्राहकांशी संबंध जोडण्याच्या प्रयत्नात असतो सध्याच्या काळात आधी कधीही नव्हते इतके ग्राहकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. आभासी माध्यमांतून आपल्या संघांना पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचे लक्ष टीव्ही आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमच्याकडे वेधून घेण्यासाठी आम्ही अनेक योजनांसह सज्ज आहोत. या करारामुळे आम्हाला खूप फायदा होईल, असा आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा लवकरच क्रिकेटरसिकांसोबत सामने प्रत्यक्ष बघायचा आनंद आम्हाला लुटता येईल अशी आम्हाला आशा आहे.’’

या अवरित भागीदारीबद्दल आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, ‘’हॅचबॅक टाटा अल्ट्रोझ कारसोबत ड्रीम११ आयपीएल २०२० स्पर्धेशी असलेले आपले नाते टाटा मोटर्सने पक्के केले, ही अत्यंत चांगली बाब आहे. टाटा मोटर्स २०१८ पासून आमच्याशी जोडलेली आहे आणि ही भागीदारी वाढतच राहील. गेल्या दोन वर्षांत टाटा मोटर्सने चाहत्यांसाठी काही विशेष योजना सादर केल्या आहेत. या कठीण व अभूतपूर्व काळातही तंत्रज्ञानाने सज्ज अशी टाटा अल्ट्रोझ ही आयपीएलच्या फॅनना भुरळ घालेल, असा मला विश्वास आहे. २०२० या वर्षात आम्ही टाटा मोटर्सला चांगला फायदा करून देऊ आणि आमची भागीदारी अशीच वृद्धिंगत होईल, अशी आशा आहे.’’

अधिकृत पार्टनर म्हणून टाटा मोटर्स यूएईतील तिन्ही स्टेडियममध्ये संपूर्ण मोसमात टाटा अल्ट्रोझ प्रदर्शनार्थ ठेवणार आहे. आयपीएलच्या सामन्यांत अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर पुरस्कार दिला जाणार असून प्रत्येक सामन्यांत फलंदाजीत ज्याचा स्ट्राइक रेट सर्वोत्तम असेल त्या खेळाडूला अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर स्मृतिचिन्ह व १००,००० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजाला अल्ट्ररोझ गाडी बक्षीस मिळणार आहे. स्टेडियममध्ये कार प्रदर्शनार्थ ठेवण्यासोबतच टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसोबत क्रिएटिव्ह पद्धतीनेही या स्पर्धेत सहभागी होणार असून आपल्या डिलरशीप व माध्यमांवरील प्लॅटफॉर्मवरूनही स्पर्धेचे प्रमोशन केले जाणार आहे. भारतातील टाटाच्या सर्व डिलरशीप्समध्ये ग्राहक आयपीएलच्या वातावणाचा आनंद लुटू शकणार आहेत. अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर मोबाईल गेमच्या माध्यमातून यावर्षी ग्राहकांनाही अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर होण्याची संधी मिळणार आहे. या मोबाईल गेममध्ये मोफत सहभागी होता येणार असून, ज्यात एखाद्याला त्याचे फलंदाजीचे कौशल्य दाखवता येईल आणि त्याच खेळात आपले मित्र किंवा कुटुंबीयांना आव्हानही देता येईल. अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर मोबाईल गेमच्या दैनंदिन विजेत्यांना ५००० रूपयांची व्हाउचर देण्यात येतील तर संपूर्ण हंगामातील विजेत्याला अल्ट्रोझ सुपर स्ट्रायकर स्मृतिचिन्ह व १००,००० रूपयांचे बक्षीस मिळेल. संपूर्ण सुरक्षितपणे आयपीएलच्या या मोसमाचा आनंद लुटण्याला प्राधान्य देण्यासाठी टाटा मोटर्स १९ सप्टेंबरपासून अल्ट्रोझ सुपर स्टायकर गेम उपलब्ध करून देणार आहे. 

यावर्षीच अल्ट्रोझ बाजारात दाखल झाली आहे आणि तिला ग्राहक व ऑटो क्षेत्रातील हरहुन्नरी लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ग्लोबल एनसीएपीने गाडीला ५ स्टार सेफ्टी रेटिंग दिल्यामुळे अल्ट्रोझ ही भारतातील सर्वांत सुरक्षित हॅचबॅक गाडी झाली असून तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. फ्युचरिस्टिक डिझाइन, कॉकपिटवरून प्रेरित इंटिरियर, आलिशान आरामदायी अनुभव व जबरदस्त कार्यक्षमता या वैशिष्ट्यांच्या बळावर बाजारात दाखल झाल्यापासूनच अल्ट्रोझने #TheGoldStandard सेट केले आहे. Ends

Be the first to comment on "ड्रीम११ आयपीएलसोबत सलग तिसऱ्या वर्षी सहप्रायोजक असल्याचे टाटा मोटर्सकडून जाहीर, टाटाची अल्ट्रोझ गाडी आहे या क्रिकेट स्पर्धेची अधिकृत पार्टनर"

Leave a comment

Your email address will not be published.


*