एलटीआयच्या कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यूमध्ये वार्षिक 10.6% वाढ; निव्वळ नफ्यामध्ये वार्षिक 17.1% वाढ

भारत: जुलै 15, 2020 (GNI): लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (BSE code: 540005, NSE: LTI) या जागतिक तंत्रज्ञान कन्सल्टिंग व डिजिटल सोल्यूशन्स कंपनीने आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीचे निकाल आज जाहीर केले आहेत.  

डॉलरमध्ये: उत्पन्न 390.3 दशलक्ष डॉलर; 4.8% तिमाही घट व 9.5% वार्षिक वाढ
कॉस्टंट करन्सी रेव्हेन्यूमध्ये 4.7% तिमाही घट व 10.6% वार्षिक वाढ
 

रुपयांमध्ये: उत्पन्न 29,492 दशलक्ष रुपये; 2.1% तिमाही घट व 18.7% वार्षिक वाढ
निव्वळ उत्पन्न 4,164 दशलक्ष रुपये; 2.6% तिमाही घट व 17.1% वार्षिक वाढ

नुकतेच साध्य केलेले यश

–          यूकेतील एका वेल्थ मॅनेजमेंट फर्मने बहुवार्षिक, मोठ्या रकमेच्या डीलसाठी एलटीआयची निवड केलेली आहे. हे डील लिगसी वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मवरून रिमोट इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट, आधुनिक सायबर सुरक्षा सेवा व आयबीएम पॉवर क्लाउंडकडे स्थलांतर यासाठी आहे  

–          आघाडीच्या एअरोस्पेस कंपनीने एलटीआयची निवड डाटा सेंटरसाठी मॅनेज्ड सर्व्हिसेस पुरवण्यासाठी, तसेच क्लाउडसाठी ऑन-प्रिमाइस इन्फ्रास्ट्रक्चरसाठी स्थलांतर शक्य करण्यासाठी केली आहे 

–          युरोपातील एका डेट मॅनेजमेंट कंपनीने म्युलसॉफ्टच्या पाठबळाने डिजिटल इंटिग्रेशन प्लॅटफॉर्म राबवण्यासाठी एलटीआयची निवड केली आहे. हे प्लॅटफॉर्म सध्याच्या सेवेची जागा घेणार आहे आणि 11 देशांतील आपल्या सर्व कार्यामध्ये सध्याच्या व भविष्यातील अॅप्लिकेशनचा समावेश करणार आहे

–          पेट्रोकेमिकल्सच्या उत्पादक व वितरक कंपनीने अॅप्लिकेशन सपोर्ट काँट्रॅक्टसाठी एकमेव भागीदार म्हणून एलटीआयला निवडले आहे

–          आघाडीच्या मनोरंजन व मीडिया एंटरप्राइज कंपनीने ओटीटी सर्व्हिसेस उपकंपनीने आपल्या राइट्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मसाठी गरजेच्या असलेल्या सुधारणेसाठी एलटीआयची निवड केली आहे

–          एलटीआयने आपल्या मोझाइक प्लॅटफॉर्मवर व्हर्टकल वाहतूक व्यवस्थेतील एका अमेरिकन उत्पादक कंपनीसाठी लायसेन्स सेल अॅग्रिमेंट पार पाडले   

–          जगातील एका सर्वात मोठ्या ऑइलफिल्ड सर्व्हिसेस कंपनीने अत्याधुनिक विकासासाठी गरजेच्या असेल्या प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सर्व्हिसेसाठी एलटीआयला निवडले आहे

–          मेडिकल डिव्हाइसेसचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने मॅनेज्ड सर्व्हिसेस डीलसाठी एलटीआयची निवड केली आहे

–          ट्रकिंग फ्लीट व सार्वजनिक वाहतुकीसाठी विमाकवच देणाऱ्या कंपनीने भागीदार म्हणून एलटीआयची निवड केली आहे आणि त्यामध्ये डाटा मॅनेज्ड सर्व्हिसेस व क्लाउड मायग्रेशन सर्व्हिसेस यांचा समावेश असणार आहे

–          आघाडीच्या आयटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने मॅनेज्ड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस डीलसाठी एलटीआयशी भागीदारी करायचे ठरवले आहे

–          आघाडीच्या हीटिंग व कूलिंग सोल्यूशन्सने एलटीआयची निवड आपल्या इन्फर्मेशन सिक्युरिटी सोल्यूशन्स म्हणून केली आहे

पुरस्कार व गौरव

–          एलटीआयची फॉरेस्टर्सच्या नाऊ टेक: ओरॅकल अॅप्स इम्प्लिमेंटेशन सर्व्हिसेस प्रोव्हायडर्सकडून दखल, 2020 मधील दुसरी तिमाही

–          एलटीआयचा ISG प्रोव्हायडर लेन्स™ सेल्सफोर्स इकोसिस्टीम पार्टनर्स 2020 यूएस रिपोर्टमध्ये रायजिंग स्टार फॉर मॅनेज्ड अॅप्लिकेशन सर्व्हिसेस म्हणून गौरव

–          एलटीआयला ISG प्रोव्हायडर लेन्स™ मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टीम पार्टनर्स 2020 यूएस रिपोर्टमध्ये ऑफिस 365 इंटिग्रेशनसाठी लीडर म्हणून सन्मानित करण्यात आले

–          एलटीआयचा समावेश मेजर कंटेंडर व स्टार परफॉर्मर म्हणून एव्हरेस्ट ग्रुप बीएफएस रिस्क अँड कम्प्लायन्स आयटी सर्व्हिसेस पीक मॅट्रिक्स® अॅसेसमेंट 2020: बिल्डिंग क्लाउड-बेस्ट डाटा इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इंटलिजेंट रिअल-टाइम कंट्रोल्समध्ये करण्यात आला

–          पॉवरकपल्ड या एलटीआयच्या उपकंपनीची निवड अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्लूएस) आउटपोस्ट्स या हायब्रिट क्लाउड कम्प्युटिंग व अॅमेझॉन फॉरेस्टच्या उपक्रमात करण्यात आला

व्यवसायाची अन्य ठळक वैशिष्ट्ये

–          एलटीआयने अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्लूएस) बरोबर सॅप ग्राहकांसाठी अॅक्सिलरेटेड मायग्रेशन प्रोग्रॅम दाखल केला. त्यातून कंपनीचे सॅप सोल्यूशन्ससाठी एडब्लूएस क्लाउड मायग्रेशनसाठीच्या फंक्शन व तांत्रिक पैलूंचे उच्च मापदंड दिसून आले.

–          एलटीआयने मायक्रोसॉफ्टच्या भागीदारीने कॅनव्हास हा इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म दाखल केला असून, त्यावर विखुरलेल्या वातावरणात काम करणाऱ्या टीमसाठी तंत्रज्ञान व व्यवसाय यांना चालना देण्यासाठी विविध प्रक्रिया, साधने व पद्धती एकत्र आणले जाणार आहे.  

–          एलटीआयने मनुष्यबळाच्या कल्याणासाठी आणि कर्मचारी कामावर आल्यावर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेफरेडिअस हे जीडीपीआर-कम्प्लायंट रिटर्न-टू-वर्क अॅप सादर केले आहे 

–          एलटीआयला ब्रँड फायनान्स या स्वतंत्र ब्रँड मूल्यमापन कन्सल्टन्सीकडून ‘इंडिया 100 2020’ अहवालानुसार भारतातील आघाडीच्या 5 आयटी ब्रँडपैकी एक व देशातील आघाडीच्या 100 ब्रँडपैकी एक म्हणून गौरवण्यात आले

–          एलटीआय ही यूएन विमेन्स एम्पॉवरमेंट प्रिन्सिपल्स (डब्लूईपी) साठी सिग्नेटरी बनली आहे आणि ती जेंडर-रिस्पॉन्सिव्ह बिझनेस पद्धती अवलंबत आहे आणि कामाच्या ठिकाणी व जगभरातील समुदायांमध्ये समान संधी निर्माण करत आहे

एलटीआयविषयी: एलटीआय (NSE: LTI) ही जागतिक तंत्रज्ञान कन्सल्टिंग व डिजिटल सोल्यूशन्स कंपनी असून ती 400 हून ग्राहकांना यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहे. कंपनी 31 देशांत व्यवसाय करत असून, कंपनी ग्राहकांसाठी चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करते आणि एलटीआयच्या मोझाइक प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांच्या मोबाइल, सोशल, अॅनालिटिक्स, आयओटी व क्लाउड प्रवासामध्ये डिजिटल परिवर्तनाला वेग देण्यासाठी योगदान देते. लार्सन अँड टुब्रोची उपकंपनी म्हणून 1997 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला लाभलेल्या समृद्ध परंपरेमुळे ती जवळजवळ सर्व क्षेत्रांतील कंपन्यांचे सर्वात क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. एलटीआयमधली 30,000 हून अधिक जणांची टीम दररोज आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या व तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेत व परिणामकारकतेत सुधारणा होण्यासाठी, तसेच त्यांच्या ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना व भागधारकांना मूल्य देण्यासाठी सतत कार्यरत असते. अधिक माहितीसाठी पाहा http://www.Lntinfotech.com किंवा @LTI_Global वर फॉलो करा.

Be the first to comment on "एलटीआयच्या कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यूमध्ये वार्षिक 10.6% वाढ; निव्वळ नफ्यामध्ये वार्षिक 17.1% वाढ"

Leave a comment

Your email address will not be published.


*